Budh-Shukra Chalisa Yog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सौंदर्य, प्रेम, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. तर बुध ग्रहाला वाणी, विद्या आणि बुद्धिचा कारक ग्रह मानले जाते. शुक्रा ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी २५-३० दिवसांचा कालावधी लागतो. तर बुध ग्रहाला १५-३० दिवसांचा कालावधी लागतो.
पंचांगानुसार, ०४ मे २०२६ रोजी बुध-शुक्र एक दुर्लभ चालीसा योग निर्माण झाला आहे. जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून ४० डिग्री कोणीय अवस्थेत असतात, तेव्हा चालीसा योग निर्माण होतो, त्याला इंग्रजीत “नोवाइल ऐस्पेक्ट” म्हटले जाते. हा योग १२ पैका काही राशाींच्या लोकांसाठी नक्कीच लाभदायी ठरेल.
शुक्र-बुधाचा हा योग ‘या’ राशींचे भाग्य चमकवणार
मेष (Mesh Rashi)
शुक्र-बुधाचा हा योग मेष राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे.
मिथुन (Mithun Rashi)
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र-बुधाचा योग लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल.
सिंह (Singh Rashi)
शुक्र-बुधाचा योग सिंह राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल.
तूळ (Tula Rashi)
शुक्र-बुधाच्या योग तूळ राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
