June 2023 Grah Gochar Effects: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ९ ग्रह प्रत्येक महिन्याला काही अंशी स्थान बदलत असतात ज्याचा प्रभाव अनेक राशींवर दिसून येतो. काही वेळा ग्रहांचे गोचर होते तर काहीवेळा ग्रह मार्गी, वक्री होतात, प्रत्येक स्थितीनुसार ग्रह राशी व नक्षत्र बदलत असतात. येत्या जून महिन्यात तब्बल दोन ग्रहांची स्थिती व वेग बदलणार आहे. यंदाच्या वर्षातील ग्रहांचा राजा बुध हा येत्या ७ जूनला गोचर करणार आहे तर त्यापाठोपाठ दहाच दिवसात शनिदेव आपल्या स्वराशीतून वक्री होणार आहेत. याशिवाय बुध ग्रह या महिन्यात एकदा अस्त होऊन पुन्हा याच महिन्यात बुधाचा गोचरही होणार आहे. या एकूण ग्रहबदलांची तिथी व त्याचा तुमच्या राशीवर होणारा परिणाम जाणून घेऊया..

बुध गोचर (Budh Transit 2023 June)

जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ग्रहांचा राजा बुध हा गोचर करणार आहे. बुध ७ जून २०२३ ला वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सध्या बुधदेव हे मेष राशीत स्थिर आहेत. बुध हा तीक्ष्ण बुद्धी, तेज व प्रगतीचा कारक मानला जातो. त्यामुळे बुध प्रभावाने प्रभावित होणाऱ्या राशींना अत्यंत लाभदायक स्थिती अनुभवता येऊ शकते.

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
Rahu Shukra Yuti in meen rashi
विपरीत राजयोगामुळे दहा दिवसांमध्ये ‘या’ तीन राशींचे बदलणार नशीब , मिळणार गडगंज पैसा

सूर्य गोचर (Sun Transit June 2023)

ग्रहांचा मूळ राजा सूर्यदेव सुद्धा यंदा १५ जूनला वृषभ राशीतुन बाहेर पासून मिथुन राशीत प्रवेश घेणार आहेत. सूर्य हा नेतृत्वाचा, मान- सन्मानाचा व धनाचा कारक मानला जातो. यामुळे मिथुनसह काही राशींवर धनवर्षाव होण्याची चिन्हे आहेत.

शनि वक्री (Shani Vakri June 2023)

कलियुगातील न्यायधिकारी म्हणजेच शनिदेव हे १७ जून २०२३ ला कुंभ राशीत वक्री होणार आहेत. यामुळे काही राशींवर शनीची वक्र दृष्टी पडून कष्टाचे दिवस सुरु होऊ शकतात तर काहींना वक्र दृष्टीतून आराम मिळून सुख अनुभवता येऊ शकते. सूर्य गोचर क्रिया सुरु होतानाच याचा काही अंशी प्रभाव शनीच्या वक्री स्थितीत पडू शकतो परिणामी सूर्य व शनीच्या युतीचे योग आहेत.

बुध अस्त व गोचर (Budh Asta and Graha Gochar June 2023)

बुध ग्रह १९ जून २०२३ ला वृषभ राशीत अस्त होणार आहेत तर २४ जून २०२३ अस्ताव्स्थेतच ते मिथुन राशीत प्रवेश घेतील. या गोचरामुळे सूर्य व बुध युती होऊ शकते. ज्यामुळे बुधादित्य राजयोग बनण्याची चिन्हे आहेत.

हे ही वाचा<< शनी सोनपावलांनी ४ महिन्यात ‘या’ राशींना बनवतील कोट्याधीश? ‘या’ बदलांनी अनुभवू शकता स्वप्नांचं आयुष्य

जून महिन्यात ‘या’ ३ राशींवर होणार बक्कळ धनवर्षाव? (June Lucky Zodiac Signs)

तर वर पाहिल्याप्रमाणे जून महिन्यात होणाऱ्या ग्रह गोचारांमुळे १२ राशींवर कमी अधिक प्रमाणात परिणाम दिसून येऊ शकतो मात्र ३ अशा राशी आहेत ज्यांना प्रचंड प्रगतीसह अमाप श्रीमंतीची चिन्हे आहेत. या भाग्यवान राशींमध्ये मुख्यतः वृषभ, सिंह व धनु या राशींचा समावेश आहे. या मंडळींना येत्या काळात नोकरीच्या ठिकाणी भरपूर तगडा लाभ होऊ शकतो. पगार वाढल्याने अनेक इच्छा वाढतील व त्यासाठी तुम्ही काहीसा खर्च वाढवू शकता. सेव्हिंगवर लक्ष द्या. व्यवसायात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष गुंतवणूक करून मोठा लाभ मिळवता येऊ शकतो. नोकरदार मंडळींना नोकरीत बदलाचे संकेत आहेत.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)