scorecardresearch

ग्रहांचा राजकुमार बुध वृषभ राशीत प्रवेश, या ३ राशींना धनलाभ सोबतच प्रगतीची प्रबळ शक्यता

Budh Transit 2022: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीसाठी भ्रमण करतो आणि त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. बुद्धी आणि व्यवसाय देणारा बुध ग्रह ८ एप्रिलला मेष राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा बुध ग्रहाचे संक्रमण होते तेव्हा त्याचा व्यापार, शेअर बाजार, अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्या संक्रमणाचा सर्व राशींवरही परिणाम होईल. परंतु […]

budh-rashi-parivartan-2022

Budh Transit 2022: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीसाठी भ्रमण करतो आणि त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. बुद्धी आणि व्यवसाय देणारा बुध ग्रह ८ एप्रिलला मेष राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा बुध ग्रहाचे संक्रमण होते तेव्हा त्याचा व्यापार, शेअर बाजार, अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्या संक्रमणाचा सर्व राशींवरही परिणाम होईल. परंतु अशा ३ राशी आहेत ज्यांना या संक्रमणाचा विशेष लाभ मिळू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या ३ राशी…

कर्क : तुमच्या गोचर कुंडलीतून ११ व्या भावात बुधचे भ्रमण आहे. ज्याला उत्पन्न आणि नफा मार्जिन म्हणतात. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच व्यवसाय आणि करिअरमध्ये चांगले यश मिळू शकते. व्यवसायात नवीन उपक्रमातही गुंतवणूक करू शकता. तसंच बुध तुमच्या चौथ्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे वाहन आणि घराचे सुखही मिळू शकते. आईशी संबंध चांगले राहू शकतात. तसेच बुध हा तुमच्या पराक्रमाचा स्वामी आहे. त्यामुळे यावेळी तुमची ताकद वाढेल. यासोबत गुप्त शत्रूंचा नाश होईल.

सिंह: तुमच्या गोचर कुंडलीत बुध ग्रह दशम भावात भ्रमण करतोय, ज्याला करिअर आणि नोकरीचे घर म्हटले जाते. त्यामुळे, यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच, जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. यासोबतच नवीन व्यावसायिक संबंधही निर्माण होऊ शकतात. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. यावेळी तुमची कार्यशैली सुधारेल, ज्यामुळे ऑफिसमध्ये तुमची प्रशंसा होईल. यासोबतच कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. दुसरीकडे, बुध तुमच्या पैशाचा आणि वाणीचा स्वामी आहे, त्यामुळे तुम्हाला यावेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे सोबत मिळू शकतात.

आणखी वाचा : या ३ राशींचे लोक नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात, शनिदेवाची त्यांच्यावर विशेष कृपा असते

मेष: तुमच्या संक्रमण कुंडलीतून बुध द्वितीय भावात प्रवेश करतोय, ज्याला धन आणि वाणीचे घर म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तसेच, जे वकील, मार्केटिंग आणि शिक्षक यांसारख्या भाषण क्षेत्राशी निगडीत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ चांगला जाणार आहे. तसेच बुध तुमच्या तिसऱ्या आणि सहाव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुमची शक्ती वाढेल. यासोबत गुप्त शत्रूंचा नाश होईल.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Budh transit 2022 by the grace of mercury by april 25 these people will get the full fruits of their hard work prp