Mercury Rise in Cancer 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचा एका ठराविक काळाने उदय आणि अस्त होतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाताना उदय आणि अस्ताची क्रिया सुरू असते. बुध ग्रहाच्या उदय आणि अस्ताचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुधदेवाचा आता उदय होणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बुधदेवाचा उदय होणार आहे. पंचांगनुसार, ग्रहांचा राजकुमार बुध २६ ऑगस्ट २०२४ रोजी ०६:१४ वाजता कर्क राशीत उदय होणार आहे. त्यामुळे काही राशींना आयुष्यात सुख-समृद्धी अनुभवता येऊ शकते. यात कोणत्या राशींना फायदा मिळेल, हे जाणून घेऊया.

श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून ‘या’ तीन राशींचे नशीब पालटणार?

कन्या राशी (Kanya Zodiac)

या राशीमध्ये बुधदेवाचा अकराव्या भावात उदय होणार आहे. त्यामुळे कन्या राशीच्या मंडळींना या काळात नोकरी-व्यवसायात यश मिळू शकते. नोकरदार लोकांना करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. यासोबतच कर्जबाजारी लोकांना कर्जमुक्ती मिळण्याची शक्यता आहे. धनवृद्धीमुळे दीर्घकाळ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. छोट्या व्यवसायातही जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय परदेशाशी संबंधित असलेल्या लोकांना यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. आर्थिक लाभासोबतच तुमच्या कामाच्या ठिकाणीही प्रगतीची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

Surya Gochar sun transit in guru rashi dhanu
Surya Gochar 2024 : सूर्य देव करणार गुरूच्या राशीमध्ये प्रवेश, ‘या’ तीन राशी होणार मालामाल; मिळणार धनसंपत्ती अन् अपार पैसा
Daily Horoscope 12th October 2024 Rashibhavishya in Marathi | dasara 2024
१२ ऑक्टोबर पंचांग: दसऱ्याला मीनसह ‘या’ राशींवर धन-सुखाची…
6th october rashi bhavishya panchang in marathi
६ ऑक्टोबर पंचांग : अश्विन महिन्यातील विनायक चतुर्थी अन् देवी कुष्मांडाचा दिवस; आज १२ पैकी ‘या’ राशींवर होईल धन-संपत्तीचा वर्षाव
Lakshmi Narayan Rajyog before Diwali
Lakshmi Narayan Rajyog : दिवाळीपूर्वी निर्माण होणार लक्ष्मी नारायण राजयोग, ‘या’ पाच राशींना मिळणार पैसाच पैसा!
guru vakri 2024 | Jupiter Vakri In Taurus in Navratri after 12 years
१२ वर्षानंतर नवरात्रीमध्ये गुरू होणार वक्री, ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार, मिळणार अपार धनलाभ
Surya transit in libra
नवरात्रीनंतर पैसाच पैसा! सूर्याच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात येणार यश, मानसन्मान आणि भौतिक सुख
Surya-Ketu yuti these three zodic sign
सूर्य-केतूची युती देणार भरपूर पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद
Anant Chaturdashi | a rare Sanyog brings good fortune to four lucky zodiac signs
Anant Chaturdashi 2024 : अनंत चतुर्दशीच्या दिवशी निर्माण होणार दुर्मिळ संयोग; ‘या’ चार राशींचे नशीब चमकणार, बाप्पाच्या आशीर्वादाने येईल चांगले दिवस

(हे ही वाचा : देवगुरु घर सोडताच ‘या’ राशींना कोट्याधीश होण्याची संधी? देवगुरु २०२५ मध्ये दोनदा गोचर करत देऊ शकतात अपार पैसा )

तूळ राशी (Tula Zodiac)

या राशीमध्ये बुध नवव्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे आणि कर्क राशीत उदय होऊन बुध या राशीच्या दहाव्या घरात राहील. अशा परिस्थितीत तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदच आनंद येण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. या राशीच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकतो. बेरोजगार असणाऱ्या लोकांचे या दरम्यान भाग्य खुलू शकते. या काळात आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. बरेच दिवस रखडलेल्या कामांना गती मिळू शकते. सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. नात्यात गोडवा राहण्याची शक्यता आहे.

मकर राशी (Makar Zodiac)

या राशीमध्ये बुध सातव्या भावात येईल. अशा स्थितीत मकर राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात व्यवसायात विशेष प्रगती होऊ शकते. त्याशिवाय तुम्हाला आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळून तुमची आर्थिक स्थिती आणखी सुधारु शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर स्पर्धात्मक परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी परीक्षेत चांगले यश मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)