Budh Uday 2026 Impact : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा अधिपती आणि बुद्धिमत्ता, तर्क, संवाद आणि व्यवसायाचा कारक ग्रह बुध २५ जुलै २०२६ रोजी उदय पावणार आहे. जेव्हा एखाद्या ग्रहाचा उदय होतो तेव्हा त्याचे शुभ परिणाम प्रत्येक राशीवर होत असतात. ज्यामुळे काही राशींच्या नशीब खुलते. द्रिक पंचागानुसार, बुध १ जुलै रोजी अस्त पावला आणि त्याच अवस्थेत त्याने मिथुन राशीत प्रवेश केला. त्यानंतप बुध २४ जुलै रोजी मिथुन राशीतून मार्गी होत दुसऱ्याच दिवशी मिथुन राशीत उदय पावेल.
बुधाच्या या उदयामुळे व्यवसाय, शिक्षण आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रात मोठे बदल घडतील. यात काही राशींचे भाग्य उजळू शकते. जाणून घेऊन या काळात कोणत्या राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील.
मिथुन
मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. या काळात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाच्या ठिकाणी नवीन आणि महत्त्वपूर्ण संधी मिळू शकतात. तुम्ही नवीन व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही सर्वात अनुकूल वेळ आहे. तुमची तार्किक क्षमता आणि वक्तृत्व इतरांना प्रभावित करेल, ज्यामुळे तुम्हाला प्रलंबित कामे पूर्ण करण्यास मदत होईल.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी बुध उदय फलदायी ठरु शकते. या काळात तुमचा अडकलेला पैसा तुम्हाला अचानक परत मिळू शकतात. तुम्हाला कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा पगारवाढीची चांगली बातमी मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम असेल, त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल.
कन्या
बुध ग्रहाचा उदय कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ राहील. या काळात तुमच्या आर्थिक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होईल. आर्थिक गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो. कुटुंबाबरोबरचे जुने मतभेद मिटतील. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून आणि सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.
तूळ
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा उदय फलदायी ठरु शकतो. या काळात तुमची सामाजिक प्रतिष्ठा आणि मान वाढेल. जर तुम्ही मीडिया, लेखन, मार्केटिंग किंवा बँकिंग क्षेत्रात असाल, तर तुम्हाला मोठे यश मिळू शकते. तुमची कार्यनिष्ठा सुधारेल आणि तुमची निर्णयक्षमता अधिक मजबूत होईल. तुम्हाला मित्र आणि प्रियजनांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
