Budh Vakri In Kumbh Rashi : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह दर १५ दिवसांनी राशी बदलतो. काल २६ फेब्रुवारी रोजी बुध कुंभ राशीत वक्री (उलट्या दिशेने चालणार) झाला आहे. बुधाच्या या स्थितीचा परिणाम सर्व १२ राशींच्या जीवनावर काही प्रमाणात दिसून येईल. बुधाच्या वक्री गतीमुळे या पाच राशींना मोठा फायदा होऊ शकतो. पुढील २३ दिवस काही राशींच्या आयुष्यात आनंद येईल, नोकरी आणि व्यवसायातही लाभ होण्याची शक्यता आहे. हे विश्लेषण चंद्र राशीवर आधारित आहे.
तर पंचांगानुसार, काळ २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजून १७ मिनिटांनी बुध शनीच्या कुंभ राशीत वक्री झाला असून आणि शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी पहाटे १ वाजून ०२ मिनिटांनी तो पुन्हा मार्गी (सरळ दिशेने चालणार) होईल.
वृषभ
तुमच्यासाठी बुध ग्रहाची वक्री गती खूप फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या कुंडलीच्या अकराव्या घरात बुध ग्रह वक्री होणार आहे. परिणामी, त्यांच्या काही इच्छा पूर्ण होऊ शकतात. याव्यतिरिक्त, तुमच्या नोकरीत वाढ, पदोन्नतीसह प्रगतीची शक्यता आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. गुंतवणुकीतून मोठा नफा तर आयुष्यात आनंद येईल आणि शिक्षण क्षेत्रातही लक्षणीय नफा मिळू शकतो.
मिथुन
या काळात विद्यार्थ्यांना फायदा होईल. दीर्घकाळापासून रखडलेली कामे पुन्हा सुरू होईल, एकाग्रता वाढेल, ज्यामुळे अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. नोकरीच्या क्षेत्रातही फायदे मिळू शकतात. शिवाय, व्यवसायात भरीव नफा मिळू शकतो.
तूळ
या काळात तुम्हाला वारंवार प्रवास करावा लागू शकतो. नोकरीत चांगल्या ठिकाणी बदली होईल, ज्यामुळे समाधान वाटू शकते. उत्पन्नातही जलद वाढ, सामाजिक दर्जा वेगाने वाढणार. तुम्ही जितके जास्त कष्ट कराल तितके जास्त यश तुम्हाला मिळू शकेल.
मकर
तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात, शेअर बाजारातूनही मोठा नफा मिळू शकतो. दीर्घकाळापासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात, अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मालमत्तेच्या बाबतीतही मोठा फायदा होईल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारू शकते.
कुंभ
भौतिक सुखसोयींचा अनुभव घेता येईल. दीर्घकाळापासून प्रलंबित कामे यशस्वी होऊ शकतात, निर्णय घेण्याची क्षमता बळकट होईल, ज्यामुळे तुम्हाला भविष्यासाठी चांगले निर्णय घेता येतील. कुटुंबातील सदस्य प्रेमळ राहतील, एकमेकांना पाठिंबा देतील आणि त्यामुळे कामातील अडथळे दूर होऊ शकतात.
