Budh Vakri Benefits to Zodiacs: ज्येष्ठ महिना सुरू होणार आहे. यावर्षी ज्येष्ठ महिना २ मे पासून २९ जूनपर्यंत राहणार आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शेवटच्या दिवशी बुध ग्रहाची चाल बदलणार आहे. २९ जून रोजी ग्रहांचा राजकुमार बुध वक्री होणार आहे, म्हणजेच या दिवशी त्यांची उलटी चाल सुरू होईल. त्यानंतर बुध २४ जुलैपर्यंत याच अवस्थेत राहतील. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, वक्री बुध चार राशींना शुभ परिणाम देऊ शकतात. चला जाणून घेऊया.
मेष राशी (Aries Horoscope May-June)
मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. घरात उत्पन्न चांगले राहील. विवाहयोग्य लोकांना लवकरच चांगले स्थळ मिळू शकते. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल, जो तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्यास मदत करेल. आयुष्यातील जुन्या समस्या हळूहळू दूर होतील.
मिथुन राशी (Gemini Horoscope May-June)
मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध वक्री होणे शुभ मानले जात आहे. तुमची महत्त्वाची कामे सहज पूर्ण होतील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तुम्ही तुमचे विचार स्पष्टपणे आणि प्रभावीपणे मांडू शकाल. या काळात तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे.
सिंह राशी (Leo Horoscope May-June)
सिंह राशीच्या लोकांसाठी बुधाची वक्री चाल अनुकूल राहील. नात्यांमधील गैरसमज दूर होतील. आर्थिक बाबतीत हा काळ संतुलित राहील. पैशांची स्थिती स्थिर राहू शकते. कर्जातून दिलासा मिळेल. तुम्ही बचत वाढवण्यावर लक्ष द्याल. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ चांगला आहे. आजारांपासून बचाव होईल.
कुंभ राशी (Aquarius Horoscope May-June)
कुंभ राशीच्या लोकांना बुध वक्री होताच प्रगतीच्या संधी मिळतील. करिअरमध्ये वाढ होईल. नोकरी किंवा व्यवसायात मोठ्या संधी मिळू शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल. करिअरमधील अडथळे कमी होतील. आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
