Lakshmi NarayanYoga 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रात लक्ष्मीनारायण योग अत्यंत शुभ मानला जातो. जेव्हा एखाद्या राशीमध्ये बुद्धीचा कारक बुध आणि धनाचा कारक शुक्र यांची युती होते, तेव्हा हा शुभ योग तयार होतो, असे म्हटले जाते की, ज्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत हा शुभ योग असतो, त्या व्यक्तीला जीवनात खूप यश आणि सुख-समृद्धी मिळते. २६ सप्टेंबरला म्हणजेच गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी तूळ राशीत हा शुभ योग तयार होणार आहे, जो ६ नोव्हेंबरपर्यंत राहील. हा योग तयार झाल्यामुळे कोणत्या ३ राशींना फायदा होईल, ते जाणून घेऊया.

मिथुन

लक्ष्मीनारायण योग मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरेल. तुम्हाला व्यवसायात जबरदस्त फायदा होईल. या काळात तुम्हाला करिअरमध्ये लाभ मिळवण्याच्या अनेक चांगल्या संधी उपलब्ध होतील. तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळू शकते. बऱ्याच काळापासून अडकलेला पैसा परत मिळू शकतो. एखादा मोठा प्रकल्प हाती लागण्याची शक्यता आहे. मनासारखी नोकरी मिळण्याचेही योग आहेत.

कन्या

हा लक्ष्मीनारायण योग कन्या राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. व्यवसायात भरघोस नफा मिळविण्यात यशस्वी व्हाल. एखादी जुनी गुंतवणूक आता चांगला परतावा देऊ शकते. नवीन कामाची योजना आखू शकता. मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती अनुकूल राहील आणि या काळात तुमच्या बँक बॅलन्समधे वाढ होण्याचे योग आहेत.

तूळ

या योग कालावधीमध्ये तूळ राशीच्या लोकांना व्यवसायात खूप नफा मिळण्याचे योग आहेत. या काळात देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा राहील आणि त्यामुळे पैशांची कोणतीही कमतरता भासणार नाही. एखाद्या धार्मिक यात्रेला जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहील. कोणतीही सुखद बातमी ऐकायला मिळू शकते. नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचे संकेत आहेत. चांगल्या नोकरीची ऑफरही मिळू शकते.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)