Mercury Uttaraphalguni Nakshatra Transit 2026: ग्रहांचा राजकुमार बुध ५ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ४ वाजून ३१ मिनिटांनी सूर्याचे नक्षत्र असलेल्या उत्तराफाल्गुनी नक्षत्रात परिवर्तन केला आहे. सध्या बुध सिंह राशीत आहे. यानंतर ७ सप्टेंबरला बुध कन्या राशीत प्रवेश करेल. मात्र उत्तराफाल्गुनी नक्षत्राचा प्रभाव पुढेही कायम राहील, कारण या नक्षत्राचा काही भाग कन्या राशीतही येतो. द्रिक पंचांगानुसार बुधाने ५ सप्टेंबरला संध्याकाळी उत्तराफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश केला.
सध्या बुध सिंह राशीच्या शेवटच्या अंशांवर असून सूर्यदेखील सिंह राशीतच आहे. ५ सप्टेंबरच्या ग्रहस्थितीनुसार बुध उत्तराफाल्गुनी नक्षत्राच्या पहिल्या चरणात अस्त अवस्थेत आहे. यावेळी गुरू कर्क राशीत, मंगळ मिथुन राशीत, शुक्र तूळ राशीत आणि वक्री तील शनि मीन राशीत विराजमान आहे.
ज्योतिषशास्त्रात बुध हा बुद्धी, वाणी (संवाद), लेखन, मार्केटिंग, व्यापार, गणित आणि निर्णयक्षमतेचा कारक ग्रह मानला जातो. तर उत्तराफाल्गुनी नक्षत्राचा स्वामी सूर्य आहे, जो पद, प्रतिष्ठा, नेतृत्व आणि प्रशासनाचा कारक आहे. त्यामुळे बुधाचे सूर्याच्या नक्षत्रात जाणे म्हणजेच बुद्धिमत्ता आणि संवादाला प्रतिष्ठा व नेतृत्वाची जोड मिळणे होय.
या गोचरचा सर्वाधिक प्रभाव अशा क्षेत्रांवर दिसेल जिथे बोलणे, लिहिणे, रणनीती आखणे आणि लोकांना प्रभावित करणे आवश्यक असते. पत्रकारिता, डिजिटल मीडिया, कंटेंट, मार्केटिंग, व्यापार, शिक्षण, प्रशासन आणि मॅनेजमेंट क्षेत्राशी जोडलेल्या लोकांसाठी हा काळ खूप खास ठरू शकतो. चंद्र राशीच्या आधारावर पाहिल्यास, काही राशींना बुधाच्या या बदलामुळे मोठा लाभ होणार आहे.
१. वृषभ
वृषभ राशीसाठी बुधाचे सिंह राशीतील प्रवेश फलदायी ठरेल, या काळात घर किंवा मालमत्तेशी संबंधित रखडलेली कामे पुढे सरकतील. नवीन वाहन खरेदी किंवा घराशी संबंधित मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. ७ सप्टेंबरनंतर शिक्षणात, लेखनात आणि गुंतवणुकीत चांगला फायदा होईल. हा काळ आर्थिक नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
२. मिथुन
मिथुन राशीचा स्वामी स्वतः बुध आहे. सूर्याच्या नक्षत्र प्रभावामुळे तुमच्या बोलण्यात आणि कामात प्रभावीपणा येईल. मीडिया, पत्रकारिता, कंटेंट रायटिंग आणि सेल्स क्षेत्रातील लोकांना विशेष लाभ होईल. जुन्या संपर्कांतून नवीन कामे मिळतील. ७ सप्टेंबरनंतर स्वतःचा व्यवसाय किंवा वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी अत्यंत चांगला काळ सुरू होईल.
३. सिंह
सिंह राशीत बुध आधीपासूनच विराजमान आहे आणि आता तो याच राशीत सूर्याच्या उत्तराफाल्गुनी नक्षत्रात आला आहे. यामुळे सिंह राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्त्व आणि संवादकौशल्य सुधारेल. व्यावसायिकांसाठी आपली ब्रँडिंग मजबूत करण्याची ही उत्तम वेळ आहे. नोकरीत नवीन बैठका, प्रेझेंटेशन आणि वरिष्ठांसमोर आपली बाजू मांडण्याची संधी मिळेल.
४. वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बुधाचे नक्षत्र परिवर्तन फलदायी ठरेल. या काळात वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. करिअरमध्ये पुढे जाण्याची मोठी संधी मिळेल. ७ सप्टेंबरनंतर बुध अकराव्या भावात गेल्याने तुमचे उत्पन्न, नफा आणि नेटवर्क वाढेल. करिअर आणि कमाई या दोन्ही दृष्टीने हा गोचर अत्यंत मजबूत आहे.
५. धनु
धनु राशीसाठी बुधाच्या नक्षत्र परिवर्तनाने उच्च शिक्षण किंवा नवीन स्किल शिकण्याचे निर्णय मार्गी लागतील. परदेशातून किंवा दुसऱ्या शहरातून कामाची चांगली बातमी मिळू शकते. ७ सप्टेंबरनंतर बुध दहाव्या भावात आल्याने करिअर आणखी मजबूत होईल. नोकरी बदलणे, पदोन्नती (प्रमोशन) किंवा नवीन संधी शोधणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरेल.
