वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करतात आणि शुभ आणि अशुभ योग तयार करतात, ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर, देश आणि जगावर दिसून येतो. अशातच आता ग्रहांचा राजकुमार बुध १ ऑक्टोबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुधादित्य आणि भद्र महापुरुष राजयोग तयार होणार आहे. या दोन्ही योगाचा प्रभाव सर्व राशींच्या लोकावर दिसून येईल. परंतु ३ अशा राशी आहेत ज्यांची या काळात खूप प्रगती होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. तर या कोणत्या राशी आहेत ते जाणून घेऊ या.
सिंह रास –
सिंह राशीच्या लोकांसाठी भद्र आणि बुधादित्य राजयोगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. कारण तुमच्या राशीच्या धन स्थानी हे योग तयार होणार आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. तसेच समाजात तुमच्या मान-सन्मानात वाढ होऊ शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. शिवाय तुम्हाला कोणत्याही नवीन योजनेत यश मिळू शकते.
धनु रास –
भद्र आणि बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतात. कारण हे दोन्ही योग तुमच्या राशीच्या कर्म स्थानी तयार होणार आहेत. त्यामुळे या काळात तुमच्या उपजीविकेच्या क्षेत्रात वाढ होऊ शकते. व्यावसायिकांना नवीन संधीसह अनपेक्षित पैसे मिळू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांचे सहकार्य मिळू शकते. नोकरदारांचे प्रमोशन होऊ शकते.
मिथुन रास –
मिथुन राशीच्या लोकांसाठी भद्र आणि बुधादित्य राजयोगाची निर्मिती वरदानापेक्षा कमी नसू शकते. कारण हे दोन्ही योग तुमच्या राशीतून चौथ्या स्थानी तयार होणार आहेत. त्यामुळे तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. या काळात तुम्ही वाहने आणि मालमत्ता खरेदी करू शकता. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याचीही दाट शक्यता आहे. तसेच, जे लोक मालमत्ता, स्थावर मालमत्ता संबंधित व्यवसाय करतात, त्यांच्यासाठी हा काळ उत्तम सिद्ध होऊ शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)