Anant Chaturdashi 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा अनंत चतुर्दशी १७ सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार असून या शुभ दिवशी सूर्य आणि बुध ग्रहांची युतीदेखील निर्माण होत आहे. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग निर्माण होत आहे. तसेच या दिवशी रवि योगदेखील असणार आहे. ज्याचा काही राशीच्या व्यक्तींना चांगला फायदा पाहायला मिळेल. यामुळे काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल आणि समाजात मान-सन्मान वाढेल.

बुधादित्य राजयोगामुळे चमकणार तीन राशींचे भाग्य

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींना बुधादित्य राजयोग खूप सकारात्मक फळ देणारी ठरेल. हा राजयोग कर्क राशीच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभ देणारी ठरेल. त्यामुळे याकाळात आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. मन शांत राहील. आरोग्यही सृदृढ राहण्यास मदत होईल. तुमचे व्यक्तित्व सुधारेल.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना बुधादित्य राजयोग शुभ फळ प्राप्त करुन देईल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक नवे बदल पाहायला मिळतील. समाजात लोकप्रियता वाढेल. विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी उत्तम संधी आहे. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी हवे तसे यश मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होतील. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील.

हेही वाचा: ‘या’ तीन राशी कमावणार भरपूर पैसा; तब्बल ५०० वर्षांनंतर निर्माण होणार ३ दुर्मिळ राजयोग; होणार आकस्मिक धनलाभ

तूळ

बुधादित्य राजयोगाच्या प्रभावाने तूळ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. या राशीच्या व्यक्तींना बुधादित्य राजयोगाचा चांगला फायदा होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. जोडीदाराची प्रत्येक गोष्टीत साथ मिळेल. जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)