Budhaditya Yog 2026: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे गोचर अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा संयोग तिथे आधीपासूनच उपस्थित असलेल्या इतर ग्रहांशी होतो. अशा स्थितीत काही विशेष आणि फलदायी योग तयार होतात, जे काही विशिष्ट राशींसाठी अत्यंत शुभ ठरतात.
असाच एक शुभ संयोग आज कर्क राशीत निर्माण होत आहे. या राशीत सूर्य आधीपासूनच विराजमान आहे आणि आज बुध ग्रह यात प्रवेश करत आहे. पंचांगानुसार, ५ ऑगस्ट रोजी बुध ग्रहाचे कर्क राशीत गोचर होत आहे. या गोचरामुळे शक्तिशाली ‘बुधादित्य राजयोग’ निर्माण होईल. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे ४ राशींच्या लोकांना जबरदस्त लाभ मिळण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींना याचा फायदा होईल.
‘या’ ४ राशींना मिळणार प्रचंड लाभ
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी हा योग अत्यंत फलदायी ठरेल. मालमत्ता, वाहन किंवा नवीन घर खरेदी करण्याचे प्रबळ योग बनत आहेत. नोकरीत पदोन्नती (प्रमोशन) आणि पगारवाढीचे स्पष्ट संकेत आहेत. आई-वडिलांचे सहकार्य लाभेल आणि घरात मंगळकार्ये पार पडतील.
मिथुन
बुध हा मिथुन राशीचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे सूर्याबरोबरचा हा संयोग मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरेल. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळतील. तुमच्या संवादकौशल्याने आणि बोलण्याने लोक प्रभावित होतील, ज्याचा थेट फायदा व्यवसाय आणि मार्केटिंग क्षेत्रातील लोकांना होईल.
कर्क
हे गोचर कर्क राशीत होत असल्याने तुमचा आत्मविश्वास आणि मान-सन्मान वाढेल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता अधिक मजबूत होईल. व्यावसायिकांना नवीन व्यावसायिक डील्स मिळू शकतात. जोडीदाराबरोबरचे संबंध अधिक घट्ट होतील.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी हा योग सुखाचे क्षण घेऊन येईल, ज्यामुळे करिअरमध्ये मोठे सकारात्मक बदल घडू शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना अपेक्षित कंपनीकडून ऑफर मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
