Budhaditya Rajyog 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाला स्वत:चे एक स्थान आणि महत्त्व आहे. जेव्हा जेव्हा ग्रह राशी किंवा नक्षत्र बदल करतात तेव्हा तेव्हा त्याचा परिणाम १२ राशींच्या जीवनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या होत असतो. जेव्हा बुध आणि सूर्य ग्रह कुंडलीतील एखाद्या भावात किंवा राशीत एकत्र विराजमान होतात, तेव्हा ‘बुधादित्य योग’ तयार होतो. ५ ऑगस्टला बुधाने कर्क राशीत गोचर करताच या योगाची निर्मिती होईल. कारण सूर्यदेव आधीपासूनच कर्क राशीत विराजमान आहेत. हा राजयोग बनल्यामुळे राशीचक्रातील काही राशींना अत्यंत शुभ परिणाम मिळतील.
‘या’ ४ राशींचे नशीब उजळणार
मेष
बुधादित्य योग मेष राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरेल. यामुळे मालमत्तेशी (प्रॉपर्टी) संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला यश मिळू शकते. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. ऑगस्ट महिन्यात या राशीचे काही लोक नवीन वाहन खरेदी करू शकतात. माता-पित्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल.
मिथुन
बुधादित्य योग मिथुन राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरेल. या काळात तु्म्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना मोठी डील मिळू शकते, तर नोकरदार वर्गाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या संभाषण कौशल्यामुळे आणि तार्किक बोलण्यामुळे समाजात मान-सन्मान वाढू शकतो.
कर्क
बुधादित्य योगाची निर्मिती कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद, सुख घेऊन येईल. या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडतील आणि आत्मविश्वास वाढेल. काहींना इच्छित नोकरी मिळू शकते. आर्थिक प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशी तुमचे संपर्क वाढतील.
तुळ
तुळ राशीच्या लोकांना बुधादित्य योग चांगले दिवस घेऊन येईल. या काळात तुम्ही कार्यक्षेत्रात अधिक सक्रिय राहाल आणि वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना यश मिळू शकते. व्यावसायिकांना चांगला नफा होईल. जे स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांचे स्वप्न ऑगस्ट महिन्यात पूर्ण होऊ शकते.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
