Budh Gochar 2023 in Vrishabha: जून महिन्याची सुरुवात यंदा अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रह गोचरसह होणार आहे. येत्या तीन दिवसात बुध ग्रह वृषभ राशीत महागोचर करणार आहे. ७ जून २०२३ ला बुधदेव वृषभ राशीत येतील तर १५ जून २०२३ ला वृषभ राशीत सूर्यदेव सुद्धा प्रवेश घेणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रातील अभ्यासानुसार बुध व संगम होतो तेव्हा त्यातून बुधादित्य राजयोग निर्माण होत असतो. या बुधादित्य राज्योगाला ज्योतिषशास्त्रात प्रचंड महत्त्व आहे. याचा प्रभाव सुद्धा सर्व १२ राशींवर कमी अधिक प्रमाणात दिसून येऊ शकतो पण सध्या तीन अशा राशी आहेत ज्यांना बुधादित्य राजयोग अत्यंत लाभदायक ठरू शकतो. या राशींना विविध रूपांमध्ये धन लाभ, मान- सन्मान व प्रतिष्ठा लाभू शकते. या राशी कोणत्या आहेत हे पाहूया… बुधादित्य राजयोग बनल्याने 'या' राशींना लाभणार सूर्यासम श्रीमंती? वृषभ रास (Taurus Zodiac Horoscope) बुध गोचरासह तयार होणारा बुधादित्य राजयोग हा वृषभ राशीच्या मंडळींना लाभदायक सिद्ध होऊ शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे हा राजयोग वृषभ राशीतच तयार होत असतो. या काळात तुम्हाला तुमच्या वाणीच्या माध्यमातू प्रचंड लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला अचानक व अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो ज्यामुळे तुमचे काही अनियोजित पण आवश्यक खर्च सहज पूर्ण करता येऊ शकतो. तुम्हाला नोकरीत बदलाची संधी मिळू शकते. तुम्ही सुरु केलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्त होऊ शकते पण प्रचंड संयमाने वागणे आवश्यक आहे. कन्या रास (Virgo Zodiac Horoscope) कन्या राशीच्या मंडळींना नशिबाची तगडी साथ लाभू शकते. कामाच्या निमित्ताने परदेश प्रवासाची संधी दिसून येत आहे, कामाच्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक वातावरण अनुभवायला मिळेल तुमचे हितशत्रू सुद्धा काही प्रमाणात तुमची साथ देऊ शकतील. धार्मिक व मंगलकार्यात तुमचा सहभाग वाढू शकतो. तुमचे मन शांत असल्याने अनेक नवे व महत्त्वाचे निर्णय घेण्याची ताकद मिळू शकते. अधिकाधिक गुंतवणुकीवर भर देण्याचा प्रयत्न करा. हे ही वाचा<< शनीदेव पुढील दोन वर्ष ‘या’ ५ राशींना अच्छे दिन देऊन करणार मालामाल? तुमची रास कधी होऊ शकते कोट्याधीश? सिंह रास (Leo Zodiac Horoscope) सिंह राशीच्या आयुष्यात येत्या काळात एखादी आयुष्य बदलवून टाकणारी घटना घडू शकते . तुमचे काम मार्गी लावण्याचा वेग वाढू शकतो. नोकरीत बदलाचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वर्तणुकीत व दृष्टिकोनात बदल करण्याची गरज आहे. तुमच्या वडिलांच्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो पण त्यापूर्वी थोडे दिवस मेहनत घ्यावी लागू शकते. तुम्हाला पत्नीचं रूपात लक्ष्मीचा आशीर्वाद लाभू शकतो. (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)