Sury- Budh Budhaditya Yoga 2026 : बुध ग्रह ७ जुलै २०२६ रोजी राशी परिवर्तन करणार आहे. बुध वक्री गतीने चालत कर्क राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल, जिथे सूर्यदेव आधीपासूनच विराजमान आहेत. यामुळे ७ जुलै रोजी सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे ‘बुधादित्य योग’ निर्माण होईल. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींना करिअर आणि आर्थिक क्षेत्रात अत्यंत शुभ परिणाम मिळू शकतात. जाणून घेऊया या भाग्यवान राशींबद्दल

१. वृषभ

बुधादित्य योग वृषभ राशीसाठी फलदायी ठरु शकतो. या योगामुळे आर्थिक बाबींमध्ये तुम्हाला मोठे यश मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. जे लोक वारसाहक्काने मिळालेला व्यवसाय करतात, त्यांना एखादी चांगली डील मिळाल्याने मोठा फायदा होऊ शकतो. यासह नोकरदार वर्गालाही कार्यक्षेत्रात सुखाद बदल पाहायला मिळतील. लोकांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल. राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांनाही चांगले परिणाम मिळण्याचे संकेत आहेत.

२. सिंह

सूर्य आणि बुधाचा बुधादित्य योग सिंह राशीसाठी भाग्यशाली ठरु शकतो. या योगाचा शुभ प्रभाव तुमच्या करिअरवर प्रामुख्याने दिसून येईल. या राशीच्या जातकांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना परदेशातही नोकरीच्या संधी मिळू शकतात. गुंतवणुकीतून चांगला आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत. बुध आणि सूर्य तुमचे संवादकौशल्य (Communication Skills) सुधारतील. जे लोक पब्लिक डीलिंग किंवा जनसंपर्काचे काम करतात त्यांना अनुकूल परिणाम मिळतील. तुमचे कौटुंबिक जीवनही आनंदी राहील.

३. कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य योगाची निर्मिती सुख अनुभव घेऊन येईल. हा योग तुमच्या कार्यक्षमतेत मोठी सुधारणा करेल. तुम्ही तुमच्या कामाने वरिष्ठांना (सीनियर्सना) प्रभावित करू शकाल. काही लोकांना पदोन्नती (प्रमोशन) मिळण्याचे योग आहेत. तसेच, जे तरुण बऱ्याच काळापासून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांना यश मिळू शकते. व्यावसायिकांना या बुधादित्य योगामुळे चांगला नफा होईल. या काळात तुमच्या आरोग्यातही सकारात्मक आणि चांगले बदल पाहायला मिळतील.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)