बुध-सूर्यच्या संयोगाने बनलाय बुधादित्य योग! ज्योतिषशास्त्रानुसार ‘या’ राशींचे बिघडलेले काम सुरळीत होईल

१ ऑगस्ट रोजी बुधाने सिंह राशीत प्रवेश केला आहे आणि १७ ऑगस्ट रोजी सूर्याने सिंह राशीत प्रवेश केला आहे. ही परिस्थिती पाहता १७ ऑगस्ट रोजी बुद्ध आदित्य योगाची स्थापना झाली आहे.

बुध-सूर्यच्या संयोगाने बनलाय बुधादित्य योग! ज्योतिषशास्त्रानुसार ‘या’ राशींचे बिघडलेले काम सुरळीत होईल
बुध-सूर्यच्या संयोगाने बनलाय बुधादित्य योग(फोटो: संग्रहित फोटो)

ज्योतिषशास्त्रात काही ग्रहांच्या संयोगामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होतात. बुध आणि सूर्य अशा स्थितीत आल्यावर बुधादित्य योग तयार होतो. ज्योतिषशास्त्रानूसार बुद्धादित्याची तुलना राजयोगाशी केली जाते. अशा स्थितीत या योगाचा प्रभाव खूप मजबूत आणि परिणामकारक असतो. १ ऑगस्ट रोजी बुधाने सिंह राशीत प्रवेश केला आहे आणि १७ ऑगस्ट रोजी सूर्याने सिंह राशीत प्रवेश केला आहे. ही परिस्थिती पाहता १७ ऑगस्ट रोजी बुद्ध आदित्य योगाची स्थापना झाली आहे.

हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे की ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, वाणी, तर्क, व्यापार, वाणिज्य आणि इतर संबंधित गोष्टींचे प्रतीक मानले जाते. सूर्य एकाच वेळी राजे, सरकार आणि उच्च प्रशासकीय पदांचा कारक मानला जातो. याशिवाय सूर्य व्यक्तीला शक्ती आणि जीवन ऊर्जा देतो. जेव्हा हे दोन अत्यंत शक्तिशाली ग्रह अशा स्थितीत एकत्र येतात, तेव्हा बहुतेकदा असे दिसून येते की स्थानिकांच्या जीवनात व्यावसायिक किंवा शैक्षणिक प्रगतीसाठी अनुकूल परिणाम दिसून येतात. चला जाणून घेऊया की सूर्य-बुध संयोग कोणत्या राशीच्या लोकांसाठी शुभ आहे.

( हे ही वाचा: Surya Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे संक्रमण मेष, कर्क राशींसह ‘या’ राशींना बनवेल मालामाल)

मेष राशी

मेष राशीच्या लोकांना सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने अनुकूल परिणाम मिळतील. या काळात तुमचे शैक्षणिक लक्ष अधिक चांगले राहील आणि तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा देण्याची योजना आखत असाल तर त्यासाठी हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. तसेच या राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर राहील. तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुम्ही हाती घेतलेले काम पूर्ण होईल. यावेळी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांनाही सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने भरपूर लाभ मिळतील. या राशीच्या लोकांना मीडिया, सल्लामसलत इत्यादी क्षेत्रात यश मिळेल. या काळात तुमचे संवाद कौशल्य वाढेल. तसेच लेखन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरेल. व्यावसायिक लोक नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि नवीन लोकांना भेटण्यासाठी सहली देखील घेऊ शकतात आणि या सहली आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. आर्थिक बाजूही चांगली राहील. मात्र या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

( हे ही वाचा: शुक्रदेव करतील सिंह राशीत प्रवेश; ‘या’ ३ राशींच्या लोकांचे चमकेल भाग्य)

कर्क राशी

सूर्य-बुध संयोगाचा सकारात्मक प्रभाव संपूर्ण ऑगस्टमध्ये कर्क राशीच्या लोकांवर चांगला दिसून येईल. मेष राशीच्या लोकांना आर्थिक किंवा संशोधन क्षेत्रात यश मिळेल. या व्यतिरिक्त, या राशीखालील ज्यांना ज्योतिषशास्त्र शिकण्यात रस आहे, त्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी, विशेषत: स्वतःची कंपनी चालवणाऱ्यांसाठी ही वेळ अनुकूल असण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही चांगले पैसे कमवू शकाल. कोणताही महत्त्वाचा निर्णय तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच घ्यावा.

धनु राशी

सूर्य आणि बुध यांच्या संक्रमनाचा चांगला प्रभाव ऑगस्ट महिन्यामध्ये धनु राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यवान असेल. या राशीच्या व्यावसायिकांना चांगले आर्थिक यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही या महिन्यात रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचारही करू शकता. तुमचे आरोग्य या महिन्यात चांगले राहील. या राशीचे जे विद्यार्थी परदेशात पुढील शिक्षण घेण्याचा विचार करतात, त्यांच्यासाठी हा काळ अतिशय चांगला राहील. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबाची चांगली साथ राहील. त्यामुळे महत्वाची कामे पूर्ण होतील.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Gauri Ganpati 2022: यंदा गणपतीत ज्येष्ठा गौरी आवाहन कधी? जाणून घ्या तारीख, वेळ, पूजा विधी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी