budhatitya mahalakshmi and samasaptak yog on 10 august 2026 : ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. या महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरू होत आहे. हा आठवडा १० ते १६ ऑगस्ट असा आहे, ज्योतिषांच्या मते, हा आठवडा अनेकांसाठी नशीब पालटणारा ठरणार आहे. त्यामुळे हा आठवडा अत्यंत खास आहे. काही राशींसाठी लाभदायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तर काहींना सावधानता बाळगणे आवश्यक राहील.
सोमवारी १० ऑगस्ट २०२६ रोजी विशेष ग्रहस्थितीमुळे अनेक शुभ योग तयार होणार आहेत, जे धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. कर्क राशीतील सूर्य व बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य योग तर मिथुन राशीतील चंद्र व मंगळ यांच्या स्थितीमुळे महालक्ष्मी योग तयार होईल. याशिवाय, कन्या राशीतील शुक्र व मीन राशीतील शनी यांच्यात समसप्तक योग देखील तयार होणार आहे. तर चला जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत ते…
कर्क
तुमच्या राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे . चंद्र व मंगळ यांच्या युतीने तयार होणारा महालक्ष्मी योग आर्थिक लाभ व करिअरमध्ये प्रगती दर्शवतो.
सिंह
या दिवशी तयार होणारे शुभ योग तुमच्या प्रयत्नांना लवकर फळ देऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची आणि कौटुंबिक जीवनात आनंद वाढण्याची शक्यता आहे.
धनु
तुमच्या राशीवरही या योगाचा प्रभाव आहे. जीवनातील समस्या कमी होऊ शकतात आणि आरोग्यात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. तसेच रखडलेली कामेही पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कुंभ
तुमच्या राशीचा स्वामी शनी व शुक्र यांच्यात समसप्तक योग तयार होत आहे, जो तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद व संतुलन आणू शकतो. साडेसातीमुळे निर्माण झालेल्या समस्यांपासून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
मीन
तुमच्या राशीतील शनीचे स्थान तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचे आहे. शनीशी संबंधित नकारात्मक परिणाम देखील कमी होऊ शकतात.
