Premium

एका वर्षाने बुध गोचरासह भद्रा राजयोग बनून ‘या’ राशी गडगंज श्रीमंत होणार? मोठा धनलाभ व वैभवप्राप्तीचा योग

Budh Gochar 2023: बुध ग्रहाच्या प्रथम गोचराने बुधादित्य राजयोग तर द्वितीय गोचराने भद्र राजयोग तयार होत आहे. या राजयोगाने तीन राशींच्या कुंडलीत प्रचंड धनलाभ व प्रगतीचा योग घेऊन येऊ शकतो. या राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होणे अपेक्षित आहे…

Budhdev Gochar, Bhadra Rajyog, Budhaditya, These Zodiac Signs Will Earn Crores, Money Astrology News Today,
भद्रा महापुरुष राजयोगाने 'या' राशी होतील श्रीमंत? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Budh Gochar 2023 Bhadra Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार येत्या जून महिन्यात सर्वात महत्त्वाचे बुध गोचर होणार आहे. ७ जूनला बुध ग्रह वृषभ राशीत गोचर करणार आहे. त्यानंतर जून महिन्यात वृषभ राशीतच बुधदेव उदित होणार आहेत व पुन्हा वृषभमधून मिथुन राशीत गोचर करणार आहेत. बुध ग्रहाच्या प्रथम गोचराने बुधादित्य राजयोग तर द्वितीय गोचराने भद्र राजयोग तयार होत आहे. २४ जून ला मिथुन राशीत बुधदेव तब्बल एक वर्षाने प्रवेश घेणार आहे. या गोचरासह तयार होणारा भद्र महापुरुष राजयोग तीन राशींच्या कुंडलीत प्रचंड धनलाभ व प्रगतीचा योग घेऊन येऊ शकतो. या राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होणे अपेक्षित आहे हे जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भद्रा महापुरुष राजयोगाने ‘या’ राशी होतील श्रीमंत?

मिथुन रास (Gemini Zodiac)

आपल्या राशीत बुधदेव हे लग्न भावी स्थिर होणार आहेत यामुळे येत्या काळात आपल्याला व्यक्तिमत्वात एक झळाळी आलेली दिसून येऊ शकते. तुमच्या राशीच्या चतुर्थ स्थानाचे स्वामी बुध देव आहेत. यामुळे येत्या काळात वाहन व प्रॉपर्टी खरेदीचे योग आहेत. तुम्ही सेव्हिंग्स करण्यात यशस्वी होऊ शकता. राजकारणात सक्रिय असणाऱ्या मंडळींना येत्या काळात मोठी संधी चालून येऊ शकते. तुमच्या इच्छापूर्तीची संधी मिळाल्याने आयुष्यात सुख- समाधान व समृद्धी अनुभवता येऊ शकते.

कन्या रास (Virgo Zodiac)

भद्रा महापुरुष राजयोग बनल्याने कन्या राशीच्या मंडळींना अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. तुमच्या राशीच्या गोचर कुंडलीत दहाव्या स्थानी बुध देव गोचर करत आहेत. बुध आपल्या राशीच्या लग्नस्थानीचे स्वामी आहेत. येत्या कालावधीत आपल्याला समाजात प्रचंड मान- सन्मान लाभू शकतो. नोकरदार मंडळींना येत्या काळात मोठा लाभ होऊ शकतो. पदोन्नती व पगारवाढीचा सुद्धा योग आहे पण आपल्या कुंडलीत स्थान बदलाचे सुद्धा संकेत असल्याने नोकरीतून ट्रान्स्फर होण्याची सुद्धा चिन्हे आहेत. धनलाभ गुंतवणुकीकडे वळवण्याचा प्रयत्न करा.

हे ही वाचा<< ३० जूनपर्यंत ‘या’ राशी होतील लखपती, तर ‘या’ मंडळींच्या कुंडलीत कष्ट? शनी-सूर्य गोचराने कसे ठरेल १२ राशींचे भविष्य?

धनु रास (Sagittarius Zodiac)

धनु राशीसाठी भद्रा महापुरुष राजयोग लाभदायक सिद्ध होऊ शकतो. तुमच्या राशीचे स्वामी गुरुदेव हे तुमच्या बुद्धी व पैसे या स्थानी सक्रिय होता. आपल्या कुंडलीत परदेशवारीचे संकेत आहेत. करिअरमधील प्रगतीसह व्यवसाय सुद्धा वाढीस लागू शकतो. ज्यांचे काम परदेशी कंपनी किंवा व्यक्तींशी संबंधित आहे त्यांना सुद्धा येत्या काळात मोठा आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. भागीदारीमध्ये प्रचंड मोठे फायदे होऊ शकतात. तुम्हाला मेहनत व परिश्रमाचे फळ मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Budhdev gochar makes bhadra rajyog budhaditya these zodiac signs will earn crores of money astrology news today svs