Shukra Gochar 2022: ३१ ऑगस्टपर्यंत ‘या’ चार राशीच्या लोकांच्या आयुष्यात होईल बदल; लवकरच मिळेल आनंदाची बातमी

ज्योतिषशास्त्रात शुक्र हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शुक्र शुभ असेल तेव्हा माता लक्ष्मीचाही विशेष आशीर्वाद मिळतो.

Shukra Gochar 2022: ३१ ऑगस्टपर्यंत ‘या’ चार राशीच्या लोकांच्या आयुष्यात होईल बदल; लवकरच मिळेल आनंदाची बातमी
३१ ऑगस्टपर्यंत 'या' चार राशीच्या लोकांच्या आयुष्यात होईल बदल(फोटो: संग्रहित फोटो)

Shukra Rashi Parivartan 2022: ज्योतिषशास्त्रात शुक्र हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शुक्र शुभ असेल तर माता लक्ष्मीचा सुद्धा विशेष आशीर्वाद मिळतो. संपत्ती, वैभव, सुखसोयी आणि ऐश्वर्य प्रदान करणारे शुक्रदेव यांनी ७ ऑगस्टला राशी बदलली आहे. ७ ऑगस्टला शुक्रदेव मिथुन राशीतून कर्क राशीत विराजमान झाले आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत ते याच राशीत विराजमान राहतील. या शुक्र परिवर्तनामुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद येण्याची शक्यता आहे. तर काही राशींच्या जीवनात याचा अशुभ प्रभाव देखील होऊ शकतो. तर जाणून ३१ ऑगस्टपर्यंत कोणत्या राशींवर शुक देवाचा शुभ परिणाम राहील.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतील. वैवाहिक जीवनात चालत आलेले मतभेद या काळात संपुष्टात येतील. या काळात तुम्हाला नोकरीत मान-सन्मान मिळेल. कामात कौतुकाची थाप मिळून पदोन्नती होण्याची देखील संभावना आहे. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात. पैशाच्या बाबतीत यश मिळेल. एखादे नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. या काळात तुम्हाला लांबचा प्रवास करण्याची संधी मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

(हे ही वाचा: ‘या’ ३ राशींना शनिदेवाच्या उलट चालीचा फायदा होईल, जाणून घ्या तुमचाही यात समावेश आहे की नाही)

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांना या काळात प्रत्येक कामात यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांकडून कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. व्यापाऱ्यांना देखील या काळात फायदा होईल. आर्थिक स्थितीत बदल होईल. एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. या काळात भरपूर नफा होण्याची शक्यता आहे. तुमच्या मनासारख्या गोष्टी पार पडतील. जोडीदाराच्या शोधात असाल, तर या काळात मनासारखा जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.

कन्या राशी

या काळात कन्या राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल. जमीन किंवा वाहन खरेदीची शक्यता आहे. भावंडांशी संबंध चांगले राहतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या स्थानिकांना चांगली बातमी मिळू शकते. या काळात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले असेल. लांबचा प्रवास करण्याची संधी मिळेल. या काळात आर्थिक नफा देखील होईल. एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ चांगला आहे.

( हे ही वाचा: Venus Transist 2022: उरले फक्त काही तास! ‘या’ पाच राशींच्या आयुष्यात प्रवेश करेल प्रेम आणि पैसा)

मीन राशी

मीन राशीच्या लोकांना या काळात मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील. शुक्र संक्रमणाचा प्रभाव तुमच्या जीवनात आनंद आणि भरभराट आणेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. एखादं रखडलेलं काम या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन गाडी किंवा जागा विकत घेण्याचा विचार करत असाल, तर या काळात घ्या. आरोग्यशी संबंधित असलेल्या समस्या देखील या काळात चांगल्या होतील.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Weekly Horoscope 8-14 August 2022: येणारा आठवडा ‘या’ राशींसाठी ठरणार शुभ; जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी