Which zodiac sign makes the best partners : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीवर वेगवेगळ्या ग्रहांचा प्रभाव असतो. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी यांसह राहू-केतू यांच्या स्थितीचाही राशिभविष्याचा विचार करताना अभ्यास केला जातो. ग्रहांच्या गोचरानुसार नोकरी, व्यवसाय, आर्थिक व्यवहार, प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनाबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जातात. तर आज आपण अशा काही राशींबद्दल जाणून घेणार आहोत

ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचे काही वेगळे गुणधर्म सांगितले आहेत. १२ राशींपैकी ३ राशी ज्यांच्यामध्ये प्रेम, आपुलकी आणि जोडीदाराप्रती एकनिष्ठ राहण्याचा गुण असतो. त्यामुळे तुम्ही एखाद्याचा चांगला जोडीदार होऊ शकता असे मानले जाते. चला तर मग, या ३ राशी कोणत्या आहेत आणि त्यांचे गुणधर्म काय याबद्दल जाणून घेऊया.

कर्क

तुमच्या राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीच्या व्यक्ती संवेदनशील आणि भावनिक स्वभावाच्या असतात असे म्हंटले जाते. तुम्ही स्वतःच्या कुटुंबावर आणि जोडीदारावर मनापासून प्रेम करतात. जवळच्या व्यक्तींची काळजी घेता आणि कठीण परिस्थितीतही एकमेकांना साथ देतात. त्यामुळे तुम्हाला चांगला जोडीदार मानले जाते.

तूळ

तुमचे व्यक्तिमत्त्व रोमँटिक आणि आकर्षक असते. नातेसंबंध टिकवून ठेवण्याची आणि जोडीदाराला आयुष्यभर साथ देण्याची तुमच्यात क्षमता असते, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते. त्यामुळे तुम्ही जोडीदाराच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न करता आणि नात्यात प्रेम व समतोल राखण्याला महत्त्व देतात.

कुंभ

तुम्ही प्रत्येक गोष्टींचा स्वतंत्र विचार करता. मात्र, एकदा एखाद्या व्यक्तीशी तुमचे नाते जोडले गेले की, प्रत्येक नाते टिकवण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता. स्वतःच्या जोडीदाराला वैयक्तिक स्वातंत्र्य देता. कठीण परिस्थितीतही शांत राहून समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्हीही एखाद्याचा उत्तम जोडीदार होऊ शकता.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)