– सोनल चितळे

Cancer Yearly Horoscope 2024 Predictions in Marathi: राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. भावना, नातेसंबंध, जिव्हाळा , हळवेपणा या सगळ्याचा विचार चंद्राच्या स्थितीवरून केला जातो. कर्क राशीच्या व्यक्ती मनाने हळव्या आणि संवेदनशील असतात. सहनशील आणि मायाळू अशा या व्यक्ती करारी आणि धोरणीदेखील असतात. त्यांना बऱ्याच गोष्टींमध्ये रस असतो. एकटे दुकटे राहण्यापेक्षा त्यांना समूहासह राहायला आवडते. आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत त्या खूप खुश असतात. कित्येकदा त्यांच्या मनाचा ठाव लागणे कठीण असते. त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध घटना चटकन स्वीकारता येत नाहीत. अशा वेळी त्यांच्या हळवेपणाचा किंवा चिडचिडेपणाचा अतिरेक होतो. अशा या कर्क राशीच्या मंडळींना २०२४ हे वर्ष कसे जाईल हे पाहूया.

यंदा एप्रिल अखेरपर्यंत गुरू आपल्या दशम स्थानातील मेष राशीतून भ्रमण करेल. १ मेला गुरू लाभ स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. त्यामुळे पूर्ण वर्षभर गुरू आपल्याला साहाय्यकारी असणार आहे. आपल्या मनातील योजना पूर्ण होतील. प्रयत्नांना यश मिळेल. पूर्ण वर्षभर शनी मात्र अष्टम स्थानातील कुंभ राशीतून भ्रमण करेल. अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड देत पुढे जाण्याची तयारी ठेवावी. शनी हा कर्माचा कारक ग्रह असल्याने मेहनत वाया जाणार नाही पण कामाच्या पूर्ततेत विलंब होईल. नेपच्यून वर्षभर भाग्य स्थानातील मीन राशीत तर प्लूटो सप्तमातील मकर राशीत असेल.

umber gets the blessings of Goddess Lakshmi
Numerology: ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते माता लक्ष्मीची कृपा, कधीही कमी पडत नाही पैसा
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
28th October Rashi Bhavishya In Marathi
आजचे राशिभविष्य, २८ ऑक्टोबर : रमा एकादशीला कोणत्या राशीच्या जीवनात येणार सुख, समृद्धी, प्रेम; वाचा तुमचा सोमवार कसा असेल?
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक बळ वाढेल; कसा जाईल १२ राशींचा बुधवार?
Baroda BNP Paribas Mutual Fund, Prashant Pimple,
‘व्याजदर शिखरावर असताना दीर्घ मुदतीची रोखे गुंतवणूक योग्य’
Loksatta editorial Donald Trump victory in the US presidential election
अग्रलेख: अनर्थामागील अर्थ!
guests at home, diwali celebration, tips
दिवाळीत पाहुण्यांना घरी बोलावताय? या टीप्स नक्की लक्षात ठेवा…

या ग्रहांचे कोणतेही विपरीत फळ मिळणार नाही. भाग्यतील नेपच्यूनसह वर्षभर राहू भ्रमण करेल. तर तृतीयेतील कन्या राशीतून केतू भ्रमण करेल. प्रवासयोग, परदेशगमन, नवे करार यासाठी पूरक ग्रहमान आहे. मे अखेरपर्यंत हर्षल दशम स्थानातील मेष राशीत स्थित असेल. १ जूनला हर्षल लाभ स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. अद्ययावत तंत्रज्ञानाचा आपल्या कार्यात समावेश होईल आणि त्याचा चांगला लाभ होईल. या महत्त्वाच्या ग्रह बदलांसह इतर ग्रहांच्या भ्रमणांचा विचार करता या वर्षाचे राशीफल कसे असेल ते पाहूया.

जानेवारी :

नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच उत्साही वातावरण असेल. स्वतःला जोमाने कामात झोकून द्याल. विद्यार्थी वर्गाला परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने नेटाने अभ्यास, उजळणी आणि सराव करावा लागेल. नोकरी व्यवसायात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगले मार्गदर्शन मिळेल. खूप काही शिकायला मिळेल. विवाहोत्सुक मुलामुलींनी जास्त घाई करू नये. विवाहितांना जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल. गुंतवणूकदारांच्या पैशाचा चांगला परतावा मिळेल. पण हव्यासाने मोठी जोखीम पत्करू नका. संयम बाळगावा लागेल. घर, प्रॉपर्टी, मालमत्ता या संबंधित कामात सरकारी पाठबळ मिळेल. मूत्रपिंडावर अतिरिक्त भार येईल. योग्य वेळी औषधोपचार करावेत.

फेब्रुवारी :

सगळ्याच गोष्टी मनासारख्या व्हाव्यात अशी अपेक्षा ठेवू नका. एखादे काम पूर्णत्वाकडे जाता जाता रेंगाळेल. हिंमत सोडू नका. विद्यार्थी वर्गाने अभ्यासातील लक्ष जराही विचलित होऊ देऊ नये. सभोवती अनेक प्रलोभने आहेतच. एकाग्रता वाढवा. नोकरी व्यवसायात राजकारणी लोकांच्या सहवासात आपणही डावपेच खेळण्यात तरबेज व्हाल. ‘जशास तसे’ वर्तन उपयोगी पडेल. विवाहित मंडळींच्या सहजीवनात समजूतदारपणा कामी येईल. भावनांच्या आहारी जाऊ नका. परदेशासंबंधित कामाला चालना मिळेल. घराबाबत निर्णय घेताना प्रॅक्टिकल विचार करणे गरजेचे आहे. भावनिक गुंतवणूक नको. संमिश्र हवामानामुळे खोकला, ताप, सर्दीचा त्रास होईल.

हेही वाचा – मिथुन राशीच्या लोकांसाठी कसे जाईल वर्ष २०२४? विवाहोत्सुक मंडळींसाठी अच्छे दिन कोणत्या महिन्यात येणार?

मार्च :

आपल्या बोलण्यात स्पष्टपणा असावा, अन्यथा लोक त्याचा चुकीचा अर्थ घेतील. खबरदारी घ्यावी. कौटुंबिक समस्या चर्चेने सोडवाल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल. कोणतीही पळवाट शोधू नका. आजचे यश आपल्याला आयुष्यभर साथ देणार आहे. नोकरी व्यवसायातील गुंता सोडवताना धोरणी विचार कराल. त्यात आपले आणि इतरांचेही हित साधण्याचा आपला प्रयत्न असेल. जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करताना दमछाक
होईल. एकमेकांवरील प्रेमाखातर आपण काहीही करण्याची तयारी दाखवाल. गुंतवणूकदारांनी आर्थिक वर्षाच्या अखेरीस मोठी जोखीम पत्करू नये. सावधगिरी बाळगावी. पडझड होऊन जखम झाल्यास त्यात पू होईल. दुखणे बरेच दिवस पुरेल.

एप्रिल :

भाग्य स्थानातील उच्चीचा शुक्र अतिशय शुभफलदायी ठरेल. १३ एप्रिलला रवी दशमातील मेष राशीत प्रवेश करेल. या उच्चीच्या रवीमुळे नोकरी व्यवसायात भरघोस यश मिळेल. मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. विद्यार्थी वर्ग परीक्षेत अपेक्षित यश संपादन करेल. सुरुवातीपासून घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. विवाहोत्सुक मुलामुलींनी जोडीदाराचे संशोधन कार्य सुरू करावे. विवाहित दाम्पत्यांनी तडजोड केल्यास सुखी जीवनाचा
आनंद लुटता येईल. मित्रमंडळींच्या भेटीगाठीतून नवे चैतन्य मिळेल. गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीची गुंतवणूक खूप फायदेशीर ठरेल. घराचे काम मार्गी लागेल. महिन्याच्या उत्तरार्धात कोर्टकचेरीची कामे पूर्ण करावीत. रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवावे.

मे :

महिन्याच्या सुरुवातीलाच १ मेला गुरू वृषभ राशीत प्रवेश करेल. गुरुचे हे भ्रमण आपणास लाभकारक असेल. १४ मे पर्यंत दशम स्थानातील रवी उच्च राशीत विराजमान असल्याने कामकाजाला गती मिळेल. विद्यार्थी वर्गाने स्पर्धा परीक्षांची उत्तम तयारी करावी. नक्कीच यशस्वी व्हाल. विवाहोत्सुक मंडळींना सुयोग्य जोडीदार मिळण्यासाठी चांगला कालावधी सुरु झाला आहे. विवाहित दाम्पत्यांना संततिप्राप्तीचे योग आहेत. वैद्यकीय सल्ला आणि मार्गदर्शन हिताचे ठरेल. घर, जमीन, मालमत्ता यांचे प्रश्न ऐरणीवर येतील. कायदेशीरमार्गाने पुढे जावे. गुंतवणूकदारांना चांगला धनलाभ होईल. दीर्घ मुदतीची गुंतवणूक विशेष लाभकारक ठरेल. उष्णता आणि कफाचे विकार बळावतील.

जून :

१ जूनला मंगळ दशमातील मेष राशीत प्रवेश करेल. तर याच दिवशी हर्षल मेषेतून वृषभेत लाभ स्थानात प्रवेश करेल. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने हा मंगळ विशेष फळ देईल. हिमतीने सभा गाजवाल. उत्तम सादरीकरण कराल. खोचक प्रश्नांना सडेतोड उत्तरे द्याल. मित्रपरिवाराला मदत कराल. विद्यार्थी वर्गाने नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवातीपासून अभ्यासात मन एकाग्र करावे. खेळ, कला यातही प्राविण्य मिळवाल. विवाहित मंडळींनी अतिरिक्त खर्च प्रयत्नपूर्वक टाळावा. विवाहोत्सुक मुलामुलींनी वधुवर संशोधन करत राहावे. मनाजोगता जोडीदार मिळण्यात यश मिळेल. परदेशासंबंधित कामे मार्गी लागतील. परदेशी जाण्याची संधी देखील मिळेल. वायू प्रदूषणामुळे घसा आणि फुप्फुसे यांचे आरोग्य सांभाळावे.

हेही वाचा – Aries Yearly Horoscope 2024: मेष राशीच्या लोकांचे अच्छे दिन यंदा कोणत्या महिन्यात? धनलाभ ते आरोग्य, कसं असेल वर्ष?

जुलै :

काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्यामुळे अशा मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टींचा आपल्या जीवास त्रास करून घेणे उचित नाही. आहे ती परिस्थिती स्वीकारून पुढे चला. विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दालने खुली होतील. संधीचे सोने करावे. नोकरी व्यवसायातील खाचखळगे नीट अभ्यासा. कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. विवाह ठरण्यास चांगले ग्रहबल आहे. विवाहितांना संतति प्राप्तीसाठी देखील उत्तम ग्रहमान आहे. दूरचे प्रवास फलदायी ठरतील. अतिरिक्त खर्चाचा बोजा वाढेल. मालमत्तेच्या संबंधातील कोर्ट केसेस लांबणीवरपडतील. नवी नाती चांगली जोपासाल. गुंतवणूकदारांनी थोडे सबुरीने घ्यावे. उष्णता आणि थंडावा यांचा विचित्र परिणाम प्रकृतीवर होईल. कामामुळे दमणूक वाढेल.

ऑगस्ट :

ग्रहबल चांगले असले तरी प्रयत्नांशिवाय काही साध्य होणार नाही याची जाण ठेवावी. हिंमत आणि धैर्य यांच्या बळावर मोठ्या समस्या प्रयत्नपूर्वक सोडवाल. इथे आपला धोरणी स्वभाव उपयोगी पडेल. विद्यार्थी वर्गाने शिक्षणातील एकेक टप्पा पार करत पुढे जायचे आहे. कला, भाषा या विषयात विशेष प्राविण्य मिळवाल. नोकरी व्यवसायात विरोधकांना चांगलीच टक्कर द्याल. त्यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाहीत. न्यायाच्या मार्गाने स्वतःला
सिद्ध कराल. विवाहोत्सुक मंडळींनी वधुवर संशोधनास विशेष प्राधान्य द्यावे. गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल. पण कुठे थांबायचे हे आपले आपणच ठरवावे लागेल. अचानक घसा धरणे, लाल होणे, श्वसनास त्रास होणे अशा तक्रारी दुर्लक्षित करू नका.

सप्टेंबर :

सणासुदीच्या दिवसात आप्तेष्टांच्या भेटीगाठी झाल्याने नवे चैतन्य निर्माण होईल. प्रथा परंपरा यांचे पालन करताना मानसिक समाधान लाभेल. विद्यार्थी वर्गाने बुद्धीदेवता श्री गणेशाच्या आशीर्वादाने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आपण मांडलेला मुद्दा इतरांना पटणार नाही. याचा आपल्याला अधिक त्रास होण्याची शक्यता आहे. परदेशाशी संबंधित कामात आपले निर्णय अचूक ठरतील. घर, मालमत्ता, प्रॉपर्टी याबाबतच्या अडचणी दूर होतील. कायदेपंडितांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. गुंतवणूकदारांच्या लाभाचा आलेख चढता असेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. हितशत्रूंपासून सावध राहावे. खांदे, दंड भरून येणे, पायात पेटके येणे असे त्रास उदभवतील.

हेही वाचा – Taurus Yearly Horoscope 2024 : वृषभ राशीच्या लोकांसाठी वर्षातला कोणता महिना असेल सर्वात चांगला? जाणून घ्या, बारा महिन्याचे भविष्य

ऑक्टोबर :

रवीचे बल कमजोर असल्याने मोठी आर्थिक उलाढाल करू नका. सतर्क राहणे महत्त्वाचे ! भावनाविवश न होता व्यावहारिक दृष्टीने प्रश्न सोडवावे लागतील. विद्यार्थी वर्गाला गुरुबळाची साथ आहे. निर्धार कायम ठेवून सातत्य टिकवलेत तर यश आपलेच आहे. परदेशातील शिक्षणाचा योग बलवान आहे. नोकरी व्यवसायात अनेक पेच प्रसंग उभे राहतील. हिंमत दाखवायची हीच खरी परिक्षेची वेळ आहे. विवाहोत्सुक मंडळींना नवरात्रोत्सवात देवी
मातेचे आशीर्वाद मिळतील. विवाहित दाम्पत्यांना संतती प्राप्तीचे योग आहेत. जमीन, प्रॉपर्टी मध्ये आर्थिक गुंतवणूक लाभकारक असेल. मित्रमंडळींच्या मदतीला धावून जाणे आपले कर्तव्य आहे. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील.

नोव्हेंबर :

दिवाळीच्या सणाचे स्वागत मोठ्या उत्साहाने कराल. नवनिर्मितीचा आनंद लुटाल. परंपरा, संस्कृती यांची मनापासून जपणूक कराल. विद्यार्थी वर्गाने दिवाळीच्या आनंदासह पुढच्या अभ्यासाची तयारी ठेवावी. मेहनतीमध्ये कोणतीही कसूर ठेऊ नका. नोकरी व्यवसायात सत्याच्या बाजूने उभे राहावे. हितशत्रूंना घाबरू नका. आपली बाजू ठामपणे मांडाल. परदेशासंबंधित कामांना योग्य दिशा मिळेल. हितकारक पावले उचलाल. उत्सर्जन संस्थेच्या विकारांवर वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील. विवाहोत्सुक मंडळींना उत्तम ग्रहबल आहे. संतान प्राप्तीचे योगही आहेत. नियंत्रित जोखीम पत्करूनच गुंतवणूक करावी. पोकळ
आश्वासनांना भुलू नका.

डिसेंबर :

वर्षाच्या अखेरीस लहान मोठी कामे हातावेगळी कराल. गुरुबलामुळे मोठ्या जबाबदाऱ्या पेलू शकाल. ज्येष्ठ व्यक्तींकडून कौतुकाची थाप मिळेल. विद्यार्थ्यांना मनाजोगत्या शाखेचा अभ्यास करता आल्याने त्यात यश मिळवतील. नोकरी व्यवसायात बरीच कामे लांबणीवर पडतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मताप्रमाणे वागावे लागेल. प्रॉपर्टीची महत्वाची कागदपत्रे लक्षपूर्वक तपासावीत. कुटुंब किंवा मित्रमंडळींच्या समवेत प्रवास कराल. उपवर मुलामुलींचे विवाह जुळतील. विवाहित दाम्पत्यांचा संसार सुखाचा होतील. परदेशाशी निगडीत कामे काही काळ लांबणीवर पडतील. गुंतवणूकदारांनी थोडे धीराने घ्यावे. पित्त, अपचन आणि कफाचा विकार बळावेल.

हेही वाचा – वृश्चिक राशीसाठी २०२४ वर्ष कसे असणार? त्रिग्रही योग अन् शनिदेवाच्या कृपेने होऊ शकता श्रीमंत? आरोग्य व प्रेम साथ देणार का?

एकंदरीत २०२४ या वर्षात गुरू बल चांगले असल्याने कामाला गती येईल. आर्थिकदृष्ट्या प्रगती कराल. आरोग्याच्या किरकोळ वाटणाऱ्या तक्रारी दुर्लक्षित करू नका. मेहनत घेण्याची तयारी असल्यास यश नक्कीच मिळेल. अतिसंवेदनशील असणे व्यावहारिक ठरणार नाही. त्यामुळे भावनांच्या आहारी न जाता आपल्या भावनांवर ताबा मिळवलात तर २०२४ हे वर्ष सुखासमाधानाचे जाईल.

Story img Loader