Capricorn Monthly Horoscope : मकर ही शनीची रास आहे. चिकाटी, मेहनत घेणे आणि विचारी वृत्ती हे शनीचे गुणधर्म मकर राशीच्या व्यक्तींमध्ये आढळतात. जीवनात काहीतरी मिळवण्याची जिद्द आपल्यात असते. नैराश्य, उदासीनतेने आपण लवकर ग्रासून जाता. आपल्यात सेवाभावी वृत्ती आहे, महत्वाकांक्षी विचार आहेत. बऱ्याचदा आपण जुन्या मतांना धरूनच पुढे जायची तयारी दाखवता. तर अशा या मकर राशीला आपण ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे यांच्याकडून जाणून घेणार आहोत…
हनुमान जन्मोत्सव (हनुमान जयंती) विशेष भाग्यकारक ठरणार आहे. यादरम्यान तुम्हाला आनंद वार्ता मिळतील. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी मार्ग मोकळा होईल. आर्थिक स्थिती सावराल. नोकरी-व्यवसायात मोठ्या प्रकल्पात सहभागी व्हाल. वरिष्ठांपुढे आपली मते स्पष्टपणे मांडाल. आपल्या प्रभावी भाषणाचा समुदायावर विशेष पगडा दिसून येईल. अर्थात कौतुकाची थाप सुद्धा मिळेल.
अक्षय्य तृतीयेला विवाहितांच्या महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब होईल. एकमेकांच्या सानिध्यात उत्साह वाढेल. कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळवाल. गुंतवणूकदारांना अपेक्षित लाभ मिळेल. काळजीपूर्वक आणि अभ्यासपूर्वक केलेल्या गुंतवणुकीतून बक्कळ धनराशी जमा होईल. परदेशी प्रवासाची आखणी कराल.
१४ तारखेनंतर बदलणार गोष्टी
१४ तारखेनंतर घराचा, जमिनीचा व्यवहार पूर्ण होईल. लाभ होईल. कौटुंबिक हेवेदावे बाजूला ठेवून मोकळ्या मनाने नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. मान, खांदा यांतील शिरा आखडतील. अर्थातच हनुमानाच्या कृपेने महिन्याची मनासारखी सुरुवात होऊन तुमच्या महिन्याचा शेवटी गोडच होईल. तर असा मकर राशीचा एप्रिल महिना असणार आहे.
