Capricorn February Horoscope 2026 : प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात घेऊन येतो असे म्हणतात. आजचा दिवस, पुढचा महिना किंवा अगदी संपूर्ण वर्ष तुमच्या मनासारखा जाण्यासाठी ज्योतिषशात्र नेहमी आपल्याला मदत करतो. ग्रहांची साथ लाभणार का, कोणता सण आपल्यासाठी कोणती गोड बातमी घेऊन येणार हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे आज आपण मकर राशीचा फेब्रुवारी महिना कसा जाणार याबद्दल ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे यांच्याकडून जाणून घेऊया…

मकर ही शनीची रास आहे. शनी म्हणजे विलंब, अडथळे, कष्ट, शोक असे काहीसे समीकरण आपण मानतो. पण, शनी म्हणजे चिकाटी, काटकसर, संयम, दीर्घोद्योग ,सुत्रबद्धता हेही तितकेच सत्य आहे. मकर राशीच्या व्यक्तींमध्ये या दोन्ही छटा दिसून येतात. या व्यक्तींमध्ये जीवनात काहीतरी मिळवण्याची धडपड असते. तर कधी महत्वाकांक्षी पण त्यांना उदासीनताही त्यांच्यात लवकर येते. त्यांच्यात जिद्द, चिकाटी असते. स्वतःची कर्तव्ये निष्ठेने पार पाडण्याची धमक असते.

चिकाटी, मेहनत घेणे आणि विचारी वृत्ती हे शनीचे गुणधर्म मकर राशीच्या व्यक्तींमध्ये आढळतात. जीवनात काहीतरी मिळवण्याची जिद्द तुमच्यात असते. नैराश्य, उदासीनतेने आपण लवकर ग्रासून जाता. आपल्यात सेवाभावी वृत्ती आहे, महत्वाकांक्षी विचार आहेत. बऱ्याचदा जुन्या मतांना धरूनच पुढे जाणाऱ्या मकर राशीला फेब्रुवारी महिना कसा जाणार चला जाणून घेऊयात…

मनातील आराखडे प्रत्यक्षात उतरवाल. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्याल. नेटाने पुढे जाल. विद्यार्थी वर्गाला शिक्षकांचा मोलाचा सल्ला मिळेल. अभ्यासात वाखाणण्याजोगी प्रगती कराल. दासनवमी, महाशिवरात्र या सुमारास आत्मविश्वास बळावेल. नोकरी-व्यवसायात महत्त्वाचे निर्णय योग्य पद्धतीने घ्याल. सभा-समारंभात विचारांची उत्तम मांडणी कराल. विवाहितांचे प्रवास योग येतील. देशात वा परदेशातही प्रवास करण्याची तयारी कराल. नवी खरेदी कराल. गुंतवणूकदारांसाठी हा महिना जास्त जोखमीचा असणार आहे. योग्य ती सावधानी बाळगाल. जागेचे व्यवहार मार्गी लागतील. अडकलेली कामे पुढे सरकल्याने मानसिक समाधान मिळेल. घसा, श्वासोच्छ्वास आणि डोळे यांची विशेष काळजी घ्यावी.

तर असा मकर राशीचा फेब्रुवारी महिना असणार आहे…