August 2026 August Horoscope For Capricorn : मकर राशीचा स्वामी शनी आहे. कष्ट, मेहनत, चिकाटी, सातत्य यांचा शनी कारक ग्रह आहे. शनीचे बरेच गुणधर्म मकर राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. या व्यक्ती खूप मेहनत घेणाऱ्या असतात. तासन् तास कष्ट घेण्याची त्यांची तयारी असते. आपल्या सुखापेक्षा त्यांना इतरांना सुख देण्यात अधिक आनंद मिळतो. बऱ्याचदा लहानमोठ्या संकटाने मकरेच्या व्यक्ती खचून जातात. निराश होतात. पण, निरीक्षणांती असे दिसून येते की, या व्यक्तींची संकटे झेलण्याची नेहमी तयारी असते. अ

डचणीतून मार्ग काढत पुढे जाणाऱ्या मकर राशीच्या व्यक्ती फारच जिद्दीच्या असतात. भरपूर संयम त्यांच्या ठायी असतो. ‘आपण बरे आणि आपले काम बरे’ हे त्यांच्या जीवनाचे तत्व असते. जीवनात काहीतरी मिळवण्याची जिद्द आपल्यात असते. नैराश्य, उदासीनतेने आपण लवकर ग्रासून जाता. आपल्यात सेवाभावी वृत्ती आहे, महत्वाकांक्षी विचार आहेत. बऱ्याचदा आपण जुन्या मतांना धरूनच पुढे जायची तयारी दाखवता. अशा या मकर राशीला ऑगस्ट महिना कसा जाणार चला सोनल चितळे यांच्याकडून जाणून घेऊयात…

विद्यार्थी वर्ग अभ्यासासह कला, क्रीडा, साहित्य, तंत्रज्ञान यातही रस घेईल. कामाच्या आणि सण-वारांच्या धावपळीत हा महिना पटकन संपेल. योग्य मार्गदर्शनाखाली यात प्रावीण्य मिळेल. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या अनुभवाच्या बळावर मोठी मजल माराल. कामानिमित्त प्रवास कराल. वरिष्ठांच्या मनाप्रमाणे वागताना स्वतःचे विचार बाजूला ठेवावे लागतील.

शब्दाने शब्द वाढवू नका (Makar Masik Rashibhvaishya)

विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. विवाहित दाम्पत्यांनी एकमेकांच्या अडचणी समजून घ्यायची हीच खरी वेळ आहे. दीपपूजनाच्या दिवशी परस्परांचे उत्तम सूर जुळतील. नारळी पौर्णिमेला बक्कळ धनसंपत्ती मिळेल. गुंतवणूकदारांना अनुभवातून खूप गोष्टी शिकता येतील. कला क्षेत्रात विशेष नाव कमवाल. प्रॉपर्टीचे व्यवहार लांबणीवर पडतील. शब्दाने शब्द वाढवू नका.