How is November month for Capricorn : राशी चक्रातील दहावी रास म्हणजे मकर रास. मकर राशीचा स्वामी शनी आहे. शनी कष्ट, मेहनत, चिकाटी, सातत्य यांचा कारक ग्रह आहे. शनीचे बरेच गुणधर्म तुमच्या राशीत दिसून येतात. या व्यक्ती खूप मेहनत घेतात, तासन् तास कष्ट घेण्याची तयारी तुमच्यात असते. स्वतःच्या सुखापेक्षा तुम्हाला इतरांना सुख देण्यात अधिक आनंद मिळतो. बऱ्याचदा लहानमोठ्या संकटाने तुम्ही खचून जाता आणि निराश होता.
पण, निरीक्षणांती असे दिसून येते की, तुमची संकटे झेलण्याची नेहमी तयारी असते. तुम्ही अडचणीतून मार्ग काढत पुढे जाता. जीवनात काहीतरी मिळवण्याची जिद्द आपल्यात असते. नैराश्य, उदासीनतेने आपण लवकर ग्रासून जाता. तुमच्यात सेवाभावी वृत्ती आहे, महत्वाकांक्षी विचार आहेत. ‘आपण बरे आणि आपले काम बरे’ हे त्यांच्या जीवनाचे तत्व असते. अशा या मकर राशीला नोव्हेंबर महिना कसा जाणार चला जाऊन घेऊ.
मकर राशीला नोव्हेंबर महिना कसा जाणार?
अष्टमातील सिंहस्थ गुरुचे गुरुबल कमजोर होईल. दिवाळी आनंदात आणि उत्साहात साजरी होईल. विद्यार्थी वर्गाच्या अभ्यासेतर कलागुणांना वाव मिळेल. अभ्यासावरील लक्ष विचलित होऊ देऊ नका. नोकरीच्या ठिकाणी आपल्या शब्दाला मान मिळेल. वरिष्ठांकडून कामाची पोचपावती मिळेल. विवाहित मंडळींनी योजलेल्या गोष्टी विनाकारण लांबणीवर पडतील.
समजूतदारपणा दाखवाल. गुंतवणूकदारांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. आधी झालेल्या चुका परत करू नका. घर, जमीन, प्रॉपर्टी यांबाबत सध्या विचार नको. कामातील अडचणी सतर्कतेने दूर कराल. नातेवाइकांची मदत होईल. भेटीगाठी लाभकारक ठरतील. अति विचार आणि कामाच्या ताणामुळे डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागेल. २५ नोव्हेंबरला राहू आणि केतू वक्र गतीने अनुक्रमे मकर राशीत व कर्क राशीत प्रवेश करतील.
तर असा जाणार मकर राशीला नोव्हेंबर महिना…
