Capricorn Monthly Horoscope September 2026 : मकर राशीचा स्वामी शनी आहे. कष्ट, मेहनत, चिकाटी, सातत्य यांचा शनी कारक ग्रह आहे. शनीचे बरेच गुणधर्म तुमच्यामध्ये दिसून येतात. तुम्ही खूप मेहनत घेणाऱ्या असतात. तासन् तास कष्ट घेण्याची तयारी तुमच्यात असते. स्वतःच्या सुखापेक्षा तुम्हाला इतरांना सुख देण्यात अधिक आनंद मिळतो. बऱ्याचदा लहानमोठ्या संकटाने तुम्ही खचून जाता, निराश होता. पण, निरीक्षणांती असे दिसून येते की, या व्यक्तींची संकटे झेलण्याची नेहमी तयारी असते.
बऱ्याचदा तुम्ही जुन्या मतांना धरूनच पुढे जायची तयारी दाखवता. अडचणीतून मार्ग काढत पुढे जाणारी तुमची रास फारच जिद्दीची असते. जिद्दीने, चिकाटीने हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय मनाला निश्चिंती मिळत नाही. त्यामुळे भरपूर संयम तुमच्या ठायी असतो. ‘आपण बरे आणि आपले काम बरे’ असे तुमच्या जीवनाचे तत्व असते. जीवनात काहीतरी मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या, दीर्घ काळ विचार करणाऱ्या आणि कधी कधी संशय, शंका घेणाऱ्या अशा या मकर राशीला सप्टेंबर महिना कसा जाणार चला जाणून घेऊ.
सप्टेंबर महिना कसा जाणार?
कृष्ण जन्माष्टमी विशेष उत्साहवर्धक असेल. योजलेली कामे या महिन्यात मार्गी लागतील. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. अपेक्षित यश मिळेल. शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन मिळाल्याने विषयाची गोडी वाढेल. नोकरी-व्यवसायातील खाचाखोचा नेमक्या ओळखाल. राजकारणी चाल खेळाल. विवाहोत्सुकांना मनाजोगता जोडीदार मिळेल. ओळखीचे नात्यात रूपांतर होईल.
विवाहित मंडळींना कौटुंबिक समस्या भेडसावतील. एक घाव दोन तुकडे न करता, डोकं शांत ठेवून निर्णय घ्यावा. गणेशोत्सवात संमिश्र मानसिकता असेल. गुंतवणुकीसाठी थोडी विश्रांती घ्यावी. तज्ज्ञांचा सल्ला उपयुक्त ठरेल. जमिनीच्या व्यवहारात काही अडचणी उदभवतील. कोर्टकचेरीचा आधार घ्यावा लागेल. यकृत व मूत्रपिंडाचे प्रश्न, समस्या निर्माण होतील.
