Capricorn Monthly Horoscope : मकर ही शनीची रास आहे. चिकाटी, मेहनत घेणे, विचारी वृत्ती हे शनीचे गुणधर्म मकर राशीच्या व्यक्तींमध्ये आढळतात. जीवनात काहीतरी मिळवण्याची जिद्द आपल्यात असते. नैराश्य, उदासीनतेने आपण लवकर ग्रासून जाता. आपल्यात सेवाभावी वृत्ती आणि महत्वाकांक्षी विचार असतात. बऱ्याचदा आपण जुन्या मतांना धरूनच पुढे जायची तयारी दाखवता. सेवा-शुश्रूषा करण्यात आपण सदैव तत्पर असता आणि हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय तुमच्या मनाला निश्चिंती सुद्धा मिळत नाही.

जीवनात काहीतरी मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या, दीर्घ काळ विचार करणाऱ्या आणि कधी कधी संशय, शंका घेण्याचे गुण तुमच्यात असतात. असे असले तरीही स्वतःच्या सुखापेक्षा त्यांना इतरांना सुख देण्यात अधिक आनंद मिळतो. बऱ्याचदा लहानमोठ्या संकटाने मकरेच्या व्यक्ती खचून जातात, निराश होतात. पण निरीक्षणांती असे दिसून येते की, या व्यक्तींची संकटे झेलण्याची नेहमी तयारी असते. अडचणीतून मार्ग काढत पुढे जाणाऱ्या मकर राशीच्या व्यक्ती फारच जिद्दीच्या असतात. तर अशा या मकर राशीला येणारा मे महिना कसा जाणार याबद्दल आपण सोनल चितळेंकडून जाणून घेऊयात…

बुद्ध पौर्णिमेला करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. सामाजिक बांधिलकीची जाण ठेवाल. विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी नव्या संधी उपलब्ध होतील. अभ्यास, वाचन, सादरीकरण यांच्यावर भर द्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा उत्तम लाभ होईल. सहकारी वर्गाला सढळ हाताने मदत कराल. विवाहितांना कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळेल.

कौटुंबिक समस्या सोडवाल, आर्थिक गणिते नव्याने मांडाल. गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण होतील. बक्कळ धनलाभ होईल. घराचा व्यवहार फायदेशीर होईल. जमीनजुमल्याचे दस्तऐवज काळजीपूर्वक ठेवावेत. गहाळ होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त प्रवास कराल. नव्या ओळखी कामी येतील. रक्तातील साखरेचे प्रमाण बदलेल. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल.

तर असा मकर राशीचा मे महिना असणार आहे…