Moon Transit in Libra negative Impact 2026 : ३ एप्रिलच्या सकाळी चंद्राने तूळ राशीत प्रवेश केला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राचे राशी परिवर्तन हे प्रत्येक राशीच्या दैनंदिन जीवनावर काही ना काही परिणाम घडवते. चंद्राच्या या बदलामुळे काही राशींना आगामी काळात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः करिअर आणि आर्थिक बाबतीत काही अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने या राशींनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. तसेच काही साधे उपाय केल्यास या अडचणींचा प्रभाव कमी होऊ शकतो, असे मानले जाते.

वृषभ(Turus)

चंद्र तुमच्या राशीपासून सहाव्या घरात प्रवेश करत आहे. ज्योतिषशास्त्रात सहावे घर हे शत्रू, कर्ज आणि दैनंदिन संघर्षांशी संबंधित मानले जाते. त्यामुळे या काळात कार्यक्षेत्रात काही अडथळे येण्याची शक्यता आहे. ऑफिसमधील राजकारण किंवा गैरसमजांपासून दूर राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सहकाऱ्यांशी बोलताना संयम राखणे आणि कोणत्याही वादात न पडणे गरजेचे आहे. आर्थिक बाबतीतही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणावरही सहज विश्वास ठेवू नका आणि पैशांशी संबंधित व्यवहार करताना सर्व गोष्टी नीट तपासून पाहा

वृश्चिक ( Scorpio)

चंद्र तुमच्या राशीपासून बाराव्या घरात भ्रमण करत आहे. बारावे घर हे खर्च आणि अनपेक्षित आर्थिक नुकसानाशी संबंधित मानले जाते. त्यामुळे या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. अनावश्यक खरेदी टाळा आणि बचत केलेल्या पैशांचा योग्य वापर करा.
कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांचे लक्ष तुमच्या कामावर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे काम करताना निष्काळजीपणा टाळा आणि प्रत्येक जबाबदारी वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही व्यक्तीला पैसे उधार देताना किंवा गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या.

मीन(Piece)

चंद्र तुमच्या राशीपासून आठव्या घरात प्रवेश करत आहे. आठवे घर हे अनिश्चितता आणि अचानक घडामोडींशी संबंधित मानले जाते. त्यामुळे या काळात मनात अनावश्यक चिंता वाढू शकते. मानसिक तणाव टाळण्यासाठी सकारात्मक विचार ठेवणे आणि शांत राहणे आवश्यक आहे. तसेच प्रवास करताना विशेष काळजी घ्या. मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा आणि कोणतीही घाईगडबड टाळा. आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

याशिवाय, या काळात कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना घाई करू नये, असा सल्ला ज्योतिषतज्ज्ञ देतात. नवीन गुंतवणूक, कर्ज घेणे किंवा मोठ्या खर्चाचे नियोजन करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते. तसेच आरोग्याकडेही दुर्लक्ष करू नये, कारण मानसिक तणावाचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो. नियमित दिनचर्या पाळणे, पुरेशी झोप घेणे आणि सकारात्मक विचार ठेवणे या गोष्टींमुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाऊ शकते. योग्य नियोजन आणि संयम ठेवल्यास या आव्हानात्मक काळातूनही मार्ग काढणे शक्य होईल.

टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.