Rashi Bhavishya 17 April 2026 In Marathi : आज १७ एप्रिल २०२६ रोजी चैत्र कृष्ण पक्षातील अमावस्या असणार आहे. त्याचबरोबर दुपारी १० वाजून २८ मिनिटांपर्यंत वैधृती योग जुळून येईल. दुपारी १ वाजून ५९ मिनिटांपर्यंत रेवती नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून १३ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ४ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ २ वाजून १३ मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजून ४३ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज चैत्र किंवा दर्श अमावस्या असणार आहे. आजची अमावस्या तुमच्यासाठी काय घेऊन येणार जाणून घेऊयात…
दैनिक पंचांग व राशिभविष्य, १७ एप्रिल २०२६ (Dainik Rashi Bhavishya 17 April 2026 In Marathi)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)
सांपत्तिक दर्जा सुधारेल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. मनातील जुन्या इच्छा पूर्ण कराल. समाज कार्यात हिरीरीने भाग घ्याल. उत्तम गुंतवणुकीचा मार्ग निवडाल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)
प्रत्येक गोष्टीत आनंदाने रस घ्याल. कपडे-लत्ते खरेदी कराल. महिला नटण्या मुरडण्याची हौस भागवतील. चार चौघांत मिळून मिसळून वागाल. वैवाहिक सौख्यात न्हाऊन निघाल.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टींची गुप्तता पाळाल. व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मनात नसताना सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतील.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)
मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. जिथे जाल तिथे आनंद निर्माण कराल. कामातील गतीमानता वाढेल. वरिष्ठांची शाबासकी मिळवाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)
तुमचे कला गुण इतरांच्या समोर येतील. सर्वांच्या कौतुकाच्या विषय बनाल. व्यापारात चांगला फायदा होईल. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. बाहेरील अन्न पदार्थ टाळावेत.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)
आवडते साहित्य वाचाल. विशाल दृष्टिकोन ठेवाल. आध्यात्मिक गोष्टीं कडे कल वाढेल. कामात प्रगतीला वाव आहे. नवीन अनुभव गाठीशी बांधता येतील.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)
कमी श्रमातून धनलाभ संभवतो. जोडीदाराची बौद्धिक बाजू दिसून येईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. काही कामे वेळे आधीच पूर्ण होतील. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)
स्व कर्तृत्वावर कामे मिळवाल. काही गोष्टींचे चिंतन करावे. भावंडांचे प्रश्न मार्गी लावाल. मनातील नैराश्य बाजूला सारावे. प्रवासात खबरदारी घ्यावी.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)
कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. खाण्या पिण्याचे पथ्य पाळावे. स्थावरची कामे पार पडतील. शक्यतो मोजक्या शब्दांत मत मांडा. डोळ्यांची काळजी घ्यावी.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)
प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. करमणुकीच्या कार्यक्रमांचा आनंद घ्याल. संभाषणाची आवड पूर्ण कराल. तुमचे मत योग्य ठरेल.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)
कला गुण जोपासण्याचा प्रयत्न करावा. मनात उगाचच चिंता सतावेल. जामीनकीचे व्यवहार सावधगिरीने करावेत. हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. घरगुती वातावरणात रमून जाल.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)
एकांगी विचार करू नका. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल. गुंतवणुकीचे नवीन मार्ग शोधाल. कर्तव्याची जाणीव योग्य प्रकाराने बजावाल. मित्रांच्या सहवासाचा लाभ होईल.
