Hindu Nav Varsh 2024: यंदा चैत्र नवरात्रीचा उत्सव ९ एप्रिल २०२४ पासून सुरू होणार आहे आणि गुढीपाडव्याला हिंदू धर्माचे नवीन वर्ष सुरु होते. २०२४ मध्ये ९ एप्रिलला गुढीपाडवा साजरा केला जाईल. वैदिक ज्योतिष्यशास्त्रानुसार, गुढीपाडव्याला तीन शुभ राजयोग निर्माण होत आहेत. शश राजयोग, अमृत सिध्दी योग आणि सर्वार्थ सिध्दी योग नववर्षात घडणार आहेत. या तिन्ही शुभ राजयोगाच्या निर्मितीमुळे मंगळाच्या आणि शनिदेवाच्या कृपेने काही राशींचे भाग्य चमकण्याची शक्यता आहे. या राजयोगांमुळे काही राशींच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ शकतात. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हे योग शुभ ठरु शकते.

वृषभ राशी

गुढीपाडव्याला तीन शुभ राजयोगाच्या निर्मितीमुळे वृषभ राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. या राशीच्या लोकांना व्यवसायात अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसायात नफा मिळण्याची चांगली शक्यता आहे. तुमच्यासाठी प्रगती आणि यशाचे मार्ग खुले होऊ शकतात. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप चांगल्या संधी मिळू शकतात. या काळात आयुष्यातील अनेक संकटं दूर होऊ शकतात. या काळात आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे.

guru asta 2024
१४ दिवसांनी गुरु होणार अस्त! ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; नोकरीपासून प्रेमापर्यंत प्रत्येक कामात मिळू शकते यश
Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
Shani Nakshatra Parivartan
पुढील ६ महिने ‘या’ राशींचे नशीब अचानक पलटणार? ३० वर्षानंतर शनिदेवाने नक्षत्र बदल केल्याने मिळू शकतो चांगला पैसा
Surya Grahan 2024
४ दिवसांनी हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? ५०० वर्षांनी सूर्यग्रहणाला चार ग्रहांची महायुती होताच मिळू शकतो पैसा

(हे ही वाचा : १५ मार्चपासून ‘या’ राशी होऊ शकतात कोट्यधीशांच्या मालक; बुध उदयानं तुमच्या राशीला कसा लाभ होऊ शकतो? )

मिथुन राशी

हिंदू नववर्षापासून मिथुन राशीच्या लोकांना अच्छे दिन अनुभवता येऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून येऊ शकतात. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. राजयोगामुळे काही अडचणी दूर होऊ शकतात. न्यायालयीन प्रकरणात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणार्‍यांना यशासोबत काही मोठी जबाबदारी मिळू शकते. तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. 

धनु राशी

धनु राशीच्या लोकांसाठी हिंदू नववर्ष लाभदायी ठरु शकतो. या काळात उत्पन्नाच्या नवीन माध्यमांतून पैसे मिळवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांच्या पगारात वाढ होऊ शकते. नोकरदारांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. घरातील लोक आनंदी राहण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)