चैत्र नवरात्री २०२६: हिंदू कॅलेंडरनुसार, चैत्र महिन्याला विशेष महत्त्व असते. हा महिना हिंदू कॅलेंडरनुसार पहिला महिना मानला जातो. या महिन्यासोबतच नवीन हिंदू विक्रम संवतची सुरूवात होते. चैत्र नवरात्रीच्या सुरूवातीसह याच दिवशी हिंदू नवीन वर्षदेखील सुरू होत आहे. याच दिवशी गुढीपाडवादेखील साजरा केला जाईल.

हिंदू धर्मात चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवी दुर्गेच्या नऊ रूपांची भावभक्तीने पूजा केली जाते. पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथीच्या मुहूर्तावर घटस्थापना केली जाते. तर मग जाणून घेऊया या वर्षी चैत्र नवरात्र कधीपासून सुरू होत आहे, तसंच कन्या पूजनाचा मुहूर्त कधी आहे…

चैत्र नवरात्र २०२६ कधी सुरू होत आहे?

  • दिनदर्शिकेनुसार, चैत्र नवरात्रीची सुरुवात चैत्र नवरात्रीच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला होते.
  • चैत्र प्रतिपदा तिथी १९ मार्च रोजी सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी सुरू होईल आणि २० मार्च रोजी संपेल.
  • उदय तिथीनुसार, चैत्र नवरात्र १९ मार्च रोजी सुरू होईल.
    चैत्र नवरात्र शुक्रवार २७ मार्च २०२६ रोजी संपेल.

कन्या पूजन कधी केले जाते?

नवरात्रीत कन्या पूजनाचे विशेष महत्त्व आहे. अष्टमी आणि नवमी या तिथी विशेष महत्त्वाच्या आहेत. कन्या पूजन दोन्ही तिथींना केले जाते. २०२६ मध्ये चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमी २६ मार्च रोजी असेल आणि नवमी २७ मार्च रोजी असेल.

चैत्र नवरात्री २०२६ नऊ दिवस आणि नऊ देवी

  • १९ मार्च २०२६ नवरात्रीचा पहिला दिवस- अमावस्या, प्रतिपदा मां शैलपुत्री पूजा आणि घटस्थापना
  • 20 मार्च 2026- नवरात्रीचा दुसरा दिवस- माँ ब्रह्मचारिणी पूजा
  • २१ मार्च २०२६- नवरात्रीचा तिसरा दिवस- माँ चंद्रघंटा पूजा
  • २२ मार्च २०२६- नवरात्रीचा चौथा दिवस- माँ कुष्मांडा पूजा
  • २३ मार्च २०२६- नवरात्रीचा पाचवा दिवस- माँ स्कंदमाता पूजा
  • २४ मार्च २०२६- नवरात्रीचा सहावा दिवस- माँ कात्यायनी पूजा
  • २५ मार्च २०२६- नवरात्रीचा सातवा दिवस- माँ कालरात्री पूजा
  • २६ मार्च २०२६- नवरात्रीचा आठवा दिवस- माँ महागौरी पूजा
  • २७ मार्च २०२६- नवरात्रीचा नववा दिवस- माँ सिद्धिदात्री पूजा