Chanakya Niti For Success In Life : आचार्य चाणक्य हे त्यांच्या काळातील सर्वात ज्ञानी आणि बुद्धिमान पुरुषांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नीतीमध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. असे म्हटले जाते की, त्यांच्या नीतीचे पालन केल्याने जीवनात प्रचंड आनंद, यश आणि समृद्धी प्राप्त होते. या नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी काही अशा गोष्टींचा उल्लेख केलाय, ज्या करुन एक यशस्वी व्यक्ती आयुष्यात पुढे जाते. त्यांच्या मते, आयुष्यात योग्य वेळी योग्य कामं टाळाटाळ न करता केल्यास जीवनात तुम्हाला प्रचंड यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अशी कोणती कामं आहेत जाणून घेऊ…
१) महत्वाचे काम लगेच करणे
आचार्य चाणक्यांच्या मते, सर्वात महत्त्वाची कामे आधी पूर्ण करण्याची सवयीने व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकतो हे काम उद्या करायचे की नंतर करायचे, याचा कधीही विचार करत नाहीत. एक यशस्वी व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाची असलेली कामे तात्काळ पूर्ण करते. आचार्य चाणक्यांनी वेळेला कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वात मौल्यवान संपत्ती म्हटले आहे.जर आपण महत्त्वाची कामे पुढे ढकलली, तर ती हळूहळू जीवनात दबाव आणि त्रासाचे कारण बनतात. (Chanakya Neeti Rules for a Successful Life )
२) ज्ञान वाढवण्यात विलंब न करणे
चाणक्य नीतीनुसार, माणसाची खरी शक्ती त्याच्याकडे असलेल्या ज्ञानात असते. यशस्वी लोक नवीन गोष्टी शिकण्यास कधीही टाळाटाळ करत नाहीत. ते दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात. यशस्वी लोकांचा अनेकदा असा विश्वास असतो की, आज शिकलेल्या गोष्टी त्यांना भविष्यातील यशस्वी होण्यासाठी फायदेशीर ठरु शकता.त्यामुळे यशस्वी लोक आपले ज्ञान आणि कौशल्ये वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.
३) कष्टापासून दूर पळणे
आचार्य चाणक्यांच्या मते, यशस्वी लोक कष्टाला कधीही ओझे मानत नाहीत. ते कष्टाला यशाचा मार्ग समजतात. यशस्वी व्यक्ती कामे अवघड समजून कधीही पुढे ढकलत नाही. काम कितीही आव्हानात्मक असले तरी, ते कोणत्याही परिस्थितीत ते वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. चाणक्याच्या मते, आळस आणि टाळाटाळ माणसाला अपयशाकडे घेऊन जाते.
४) चुका त्वरित सुधारणे
आयुष्यात यशस्वी होणारे लोक आपल्या चुकांपासून कधीही दूर पळत नाहीत. आपली चूक लक्षात येताच, ते ती मान्य करतात आणि शक्य तितक्या लवकर ती सुधारण्याचा प्रयत्न करतात. ‘नंतर दुरुस्त करू’ असा विचार ते करत नाहीत. ते कोणताही विलंब न करता आपल्या चुका सुधारण्यासाठी कृती करतात. जर तुम्ही तुमच्या चुका वेळेवर सुधारल्या नाहीत, तर त्या नंतर समस्या निर्माण करू शकतात.
५) संधी ओळखून तात्काळ कृती करणे
चाणक्य नीतीनुसार, संधी तुमच्याकडे खूप कमी काळासाठी येतात. आयुष्यात यशस्वी होणाऱ्या प्रत्येकाला हे चांगलेच ठाऊक असते. ते संधी तात्काळ ओळखतात आणि कोणताही विलंब न करता त्यावर कृती करतात. आपल्या मार्गात येणाऱ्या संधी ते पुढे ढकलत नाहीत, कारण त्यांना माहित असते की, एकदा संधी गेली की ती पुन्हा कधीच मिळणार नाही.
(टीप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
