scorecardresearch

Chanakya Niti: आरोग्य, संपत्ती आणि नातेसंबंध असे असले पाहिजे, तरच जीवनात आनंद येईल

आचार्य चाणक्य यांनी देखील मानवी जीवनातील आरोग्य, नातेसंबंध आणि संपत्तीचे स्पष्टीकरण दिले आहे.

Chanakya Niti: आरोग्य, संपत्ती आणि नातेसंबंध असे असले पाहिजे, तरच जीवनात आनंद येईल

आचार्य चाणक्य अर्थात कौटिल्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात राहणीमान, वेशभूषा, समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, वर्तन आणि देशाप्रती असलेली ओढ याविषयी अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. जर एखाद्या माणसाने या सर्व गोष्टी आत्मसात केल्या तर तो जगातील अद्भुत मानवांपैकी एक होईल. आचार्य चाणक्य यांनी देखील मानवी जीवनातील आरोग्य, नातेसंबंध आणि संपत्तीचे स्पष्टीकरण दिले आहे. सामान्य माणसाच्या जीवनात त्याचे महत्त्व काय आहे हे सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांचे मानवी आरोग्याबद्दलचे विचार
चाणक्यांनी लिहिले की, आरोग्य ही मानवी जीवनाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. अशा परिस्थितीत माणूस निरोगी शरीर, निरोगी मन, निरोगी विचारांचा मालक असेल, तर तो मोठ्या समस्यांनाही सहज सामोरे जाऊ शकतो. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे हा मानवाचा पहिला विचार असायला हवा. चाणक्य यांच्या नीतिनुसार स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी जेवताना थोडेसे पाणी घ्यावे, जेवल्यानंतर लगेच पाणी घेऊ नये. कारण ते विषासारखे असते. जेवल्यानंतर फक्त एक तासाने पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.

चाणक्यांच्या मते, निरोगी राहण्यासाठी आणि आजारांना दूर ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा शरीराची मालिश करणे आवश्यक आहे, यामुळे शरीरात साचलेली अंतर्गत घाण बाहेर पडते, शरीरातील छिद्रे उघडतात. शरीर निरोगी होते. अशा स्थितीत मसाज केल्यानंतर आंघोळ करायला विसरू नका. कारण त्यानंतरच तुमचे मन आणि शरीर शुद्ध होईल.

चाणक्य म्हणतात की, जोपर्यंत तुम्ही निरोगी आहात परिस्थिती तुमच्या नियंत्रणात असते. शरीर तुम्हाला साथ देतं. या दरम्यान तुम्ही आत्मसाक्षात्कार केला पाहिजे. कारण निरोगी शरीर आणि निरोगी मनानेच तुम्ही अध्यात्म प्राप्त करू शकता, मृत्यूनंतर तुम्ही काहीही करू शकत नाही.

नातेसंबंधांबद्दल चाणक्यांचे विचार
आचार्य चाणक्यांनी नातेसंबंधातील विश्वासाला खूप महत्त्व दिले आहे. चाणक्यांच्या मते, जर तुमचा नातेसंबंधांवर विश्वास असेल तर तुम्हाला जीवनातील कठीण काळातही यश मिळतं. नात्यात आंबटपणा नको असेल आणि नातं प्रेमाचं हवं असेल तर त्यात गर्व, अहंकाराला थारा नसावा. यासोबतच नात्यात स्वार्थ आणि ढोंग टाळले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.

नात्यात स्वतंत्रता आणि एकमेकांबद्दल आदर असणं खूप गरजेचं आहे, जर हे दोन्ही नात्यात नसेल तर नातं तुटण्याच्या टोकाला पोहोचतं. जिथे कुटुंबात, नात्यात, पती-पत्नीच्या नात्यात शिवीगाळ वाढल्या की नात्यातला गोडवा संपतो. कुटुंबातील वातावरण बिघडतं, अशा व्यक्तींचा त्याग करावा. जे खर्‍या अर्थाने हितचिंतक आहेत त्यांना नेहमीच महत्त्व दिले पाहिजे.

संपत्तीबद्दल कौटिल्याचे विचार
पैसा, संपत्ती, संपत्ती तुम्हाला आदर देते आणि प्रतिकूलतेशी लढण्यास सक्षम बनवते. अशा परिस्थितीत पैसे संपल्यानंतरच मित्र आणि पत्नीची परीक्षा होऊ शकते, असे चाणक्य सांगतात. जर तो तुमची साथ सोडत नसेल तर समजून घ्या की तो तुमचा खरा मित्र आहे, लोभी नाही.

चांगल्या आर्थिक स्थितीसाठी तुम्हाला तुमचे ध्येय निश्चित करावे लागेल. कारण ध्येयाशिवाय विजय शक्य नाही. वाईट दिवसांसाठी नेहमी पैसे गोळा करा. गरिबीत तुमच्यासोबत कोणीही नसेल, तेव्हा हा पैसा तुम्हाला उपयोगी पडेल. गरीब आणि गरिबी या दोन्ही गोष्टी विषाप्रमाणे असतात, म्हणून पैसा जपून खर्च केला पाहिजे.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या