Chanakya Niti For Money : आचार्य चाणक्या यांचे अनुभव नितिशास्त्रात वर्णन केले आहेत. जीवनातील संकटांवर कशी मात करावी इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत. इतकेच नाही तर चाणक्यांच्या वचनांचे पालन करून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येते, असं म्हणतात. चाणक्यच्या धोरणांमध्ये, व्यक्तीने पैसे कसे हाताळायचे हे सांगितले आहे. अशी काही ठिकाणे आहेत जिथे व्यक्तीने पैसे खर्च करताना अजिबात संकोच करू नये. असे केल्याने व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा कायम राहते.

धार्मिक ठिकाणी दान करा- धार्मिक कार्यात दान केलेले पैसेही पुण्य देतात. आचार्य चाणक्य म्हणतात की, व्यक्तीने कोणत्याही मंदिराला किंवा धार्मिक स्थळाला पैसे देण्यास कधीही मागे हटू नये. असे केल्याने माणसाला योग्यता प्राप्त होते. यासोबतच जीवनात सकारात्मकताही येते.

Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…
Sun transit in mesh surya gochar 2024
१ वर्षानंतर सूर्य-मंगळाची मेष राशीत युती, ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळेल बक्कळ पैसा? प्रत्येक क्षेत्रात मिळू शकेल यश

आजारी लोकांना मदत करणे- आचार्य चाणक्य यांच्या मते, एखाद्या कामासाठी पैसे खर्च करताना कधीही विचार करू नये. यामध्ये कामांमध्ये आजारी लोक प्रथम येतात. एखाद्या व्यक्तीच्या आजारपणात तुमचे पैसे खर्च होत असतील तर विचार न करता करा. असे केल्याने माणसाला नवजीवन मिळते. एखाद्याचा जीव वाचवणे हे परोपकाराचे सर्वात मोठे कार्य मानले जाते. असे मानले जाते की, एखाद्या व्यक्तीला आजारपणात मदत केल्याने जे पुण्य प्राप्त होते, ते यश आणि प्रगतीचे नवीन मार्ग उघडते.

आणखी वाचा : Chanakya Niti: आयुष्यात या ५ गोष्टी कधीही करू नका, घरात गरिबी येण्यास वेळ लागणार नाही!

गरिबांना मदत करा- चाणक्य नीतिनुसार जर एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला मदतीची गरज असेल तर यापेक्षा पुण्य दुसरे काहीही असू शकत नाही. गरीब आणि गरजूंच्या आशीर्वादाने अशा कामांसाठी खर्च होणारा पैसा भरपूर फळ देतो. या कामात मदत केल्याने त्या व्यक्तीला मान-सन्मान मिळतो. यासोबतच परलोकातही फळे मिळतात.

आणखी वाचा : Chanakya Niti: घरात असे संकेत दिसले तर वेळीच सावध व्हा, वाईट काळ सुरू होण्याआधी संकेत देतात!

सामाजिक कार्यात दान करा- आचार्य चाणक्य म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने आपल्या कमाईचा काही भाग सामाजिक कार्यासाठी द्यावा. रुग्णालय, शाळा, धर्मशाळा इत्यादी इमारतींचे बांधकाम आणि इतर सामाजिक कार्यात लोकांनी आपल्या क्षमतेनुसार देणगी द्यावी. लोकांकडून प्राप्त झालेल्या प्रार्थना व्यक्तीला भरपूर फळ देतात.