Chanakya Niti News In Marathi: आचार्य चाणक्य हे एक महान नीतिशास्त्री होते पण त्याबरोबर ते जीवनाच्या प्रत्येक घटकाचा खूप बारकाईने विचार करायचे. त्यांची चाणक्य नीति आज पण लोकांच्या जीवनात मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावते. यामध्ये कौटुंबिक नात्याला घेऊन त्यांनी खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. वडील आणि मुलीच्या नात्याविषयी चाणक्य नीतिमध्ये काय सांगितले आहे, जाणून घेऊ या.
चाणक्य मानतात की वडील आणि मुलीचे नाते अत्यंत पवित्र आणि मजबूत असते. या नात्यात जर नीट काळजी घेतली नाही तर नात्यात दूरावा येऊ शकतो. अशात वडिलांनी मुलीबरोबर कसे वागावे, याविषयी चाणक्य नीतिमध्ये सांगितले आहे.
मुलीच्या प्रत्येक निर्णयामध्ये गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करू नये
चाणक्य सांगतात की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असायला हवे. तसेच मुलींना सुद्धा तिच्या आयुष्याशी संबंधित निर्णय स्वत: घेण्याची परवानगी वडिलांनी दिली पाहिजे. जर वडील प्रत्येक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करत असेल तर मुलीचा आत्मविश्वास कमकुवत होऊ शकतो. करिअर असो किंवा लग्न, मुलीच्या मताचा आदर केला पाहिजे.
आचार्य चाणक्यनुसार, एक समजूतदार वडील तोच असतो जो मुलीला योग्य आणि अयोग्य गोष्टीतील फरक समजावून तिला आवड निवडण्याचे स्वातंत्र्य देतो.
मुला मुलींमध्ये भेदभाव करू नये
चाणक्य नीतिनुसार, मुला मुलींमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणे चुकीचे आहे. जर वडील आपल्या मुलाला जास्त अधिकार आणि प्रेम देत असेल आणि मुलीकडे दुर्लक्ष करत असेल तर मुलीच्या मनात वडिलांविषयी तिरस्कार निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुलगा असो किंवा मुलगी, दोघांना समान प्रेम, सन्मान आणि संधी दिली पाहिजे.
मुलीच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या
चाणक्य नीतिनुसार, कुटुंबाची सुरक्षा आणि विशेषत: महिलांची सुरक्षा हे वडिलांचे सर्वात मोठे कर्तव्य असते. मुलीला सुरक्षित वातावरण मिळायला पाहिजे, मग घर असो किंवा बाहेर, ती सुरक्षित असायला पाहिजे. वडील तिला स्वत:चे रक्षण कसे करायचे याच्या ट्रिक सांगू शकतो. याशिवाय तिची दिनचर्या आणि तिच्या मित्र मैत्रिणींविषयी जाणून घ्या. ती स्वत:ला सुरक्षित व स्वतंत्र समजेल, असे पोषक वातावरण तिला मिळवून द्या.
मुलीच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका
चाणक्य नीतिमध्ये शिक्षणाला जीवनाचा आधार मानले जाते. एक सुशिक्षित मुलगी संपूर्ण घराला आणि समाजाला योग्य दिशा देऊ शकते. त्यामुळे वडिलांनी मुलीच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. मुलीची आवड निवड समजून घ्यावी. तिला पुढे जाण्यास प्रोत्साहन द्यावे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)