scorecardresearch

Chanakya Niti: पुरुषांनी ‘या’ गोष्टी कायम गुप्त ठेवाव्यात, उघड होताच आदर गमावून बसतात

चाणक्य नीतिमध्ये पुरुषांना त्यांचे काही रहस्य कायम गुप्त ठेवण्यास सांगितले आहे.

Chanakya Niti: पुरुषांनी ‘या’ गोष्टी कायम गुप्त ठेवाव्यात, उघड होताच आदर गमावून बसतात

Chanakya Niti For Men: भारताचे महान अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि राजकारणी आचार्य चाणक्य यांची धोरणे आजही प्रासंगिक आहेत. त्रास, अपमान, नुकसान टाळण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचे पालन करून यशस्वी, सन्मानाने जीवन जगता येते. चाणक्य नीतिमध्ये महिला आणि पुरुषांसाठीही काही खास धोरणे सांगितली आहेत, त्यांचे पालन न केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता. चाणक्य नीतिमध्ये पुरुषांना त्यांचे काही रहस्य कायम गुप्त ठेवण्यास सांगितले आहे. अन्यथा या गोष्टी उघडकीस आल्यावर त्यांचा आदर कमी होतो आणि आयुष्यभर मान वर करून जगता येत नाही.

पुरुष या गोष्टी नेहमी गुप्त ठेवाव्यात
पुरुषांनी या गोष्टी अगदी जवळचे मित्र आणि त्यांच्या कुटुंबियांनाही शेअर करू नयेत. कारण चुकूनही या गोष्टी समोर आल्या तर त्यांचा आदर कमी होतो.

जर बायकोशी भांडण होत असेल किंवा तुमच्या दोघांची काही वैयक्तिक बाब असेल तर या गोष्टी तुमच्या जवळच्या मित्रालाही सांगू नका. आपल्या पत्नी आणि स्वतःमधील गोष्टी इतरांना सांगणे हे निंदाचे कारण बनते. यामुळे पती-पत्नी दोघांचाही आदर नष्ट होतो.

तुमचा कधी अपमान झाला तर हे कोणाला सांगू नका. तुमचा अपमान इतरांना सांगून तुमचा उरलेला सन्मानही नष्ट होतो. त्यामुळे मित्र किंवा कुटुंबातील सदस्य कितीही चांगला असला तरी त्याला अपमानाची बाब सांगू नका.

आणखी वाचा : Chanakya Niti: चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी पाळा, पत्नीसोबत कधीच भांडण होणार नाही

प्रत्येकजण दुर्बल व्यक्तीला दाबण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुमची कमतरता कोणाला सांगू नका. असे केल्याने तुमचा त्रास कमी होण्याऐवजी वाढेल. तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन लोक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील.

तुमच्याकडील पैशांबद्दल कोणालाही सांगू नका. अनेक प्रकारच्या संकटांशी लढण्यासाठी पैसा उपयोगी ठरू शकतो. जर तुमच्याकडे खूप पैसे असतील आणि तुम्ही ही गोष्ट तुमच्या जवळच्या लोकांना सांगितली तर ते हडपण्याचा खूप प्रयत्न करतील. साहजिकच पैशांशिवाय तुमची इज्जत राहणार नाही.

(टीप: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chanakya niti for men always they should keep secrets to these things otherwise will lose respect prp

ताज्या बातम्या