Chanakya Niti On Marriage : आचार्य चाणक्य यांनी त्यांनी लिहिलेल्या ग्रंथात म्हणजे नीतीमध्ये जीवनासाठी अनेक महत्त्वाचे लहान सहान बारकावे सांगितल्याने मानलं जाते. तर आज आम्ही चाणक्य नीतीमधील काही श्लोक सांगणार आहोत, जे नातेसंबंध दृढ करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. चला, चाणक्य नीतीमधील काही श्लोक वाचूया, जे तुमच्या नात्यांमध्ये आणखीन गोडवा आणू शकतात.

१. फक्त सौंदर्याचा करू नका विचार

रूपयौवनसम्पन्ना विशालकुलसम्भवाः।
विद्याहीना न शोभन्ते निर्गन्धा इव किंशुकाः ॥

या श्लोकात आचार्य चाणक्य म्हणतात की, सौंदर्य, तारुण्य आणि प्रतिष्ठित घराण्यात जन्म झाला असूनही जर एखाद्या व्यक्तीमध्ये ज्ञानाची कमतरता असेल, तर ती व्यक्ती सुगंध नसलेल्या सुंदर फुलाप्रमाणे निरुपयोगी असून फक्त शोभनीय असते. म्हणून, जोडीदार निवडताना हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, केवळ बाह्य सौंदर्य सर्वस्व नाही; त्या व्यक्तीचा स्वभाव आणि गुण यांचाही विचार केला पाहिजे.

२. देवी लक्ष्मी करते वास

मूर्खाः यत्र न पूज्यन्ते धान्यं यत्र सुसंचितम् ।
दाम्पत्योः कलहो नास्ति तत्र श्री स्वयमागता॥

चाणक्य नीतीच्या या श्लोकात असे म्हटले आहे की, ज्या ठिकाणी किंवा घरात मूर्ख माणसांचा आदर केला जात नाही, जिथे धान्य व्यवस्थित साठवले जाते आणि जिथे पती-पत्नीमध्ये भांडणे होत नाहीत, त्या ठिकाणी देवी लक्ष्मी वास करते आणि जीवनात सुख-समृद्धी येते.

३. नाती कशी टिकतात?

माता यस्य गृहे नास्ति भार्या चाप्रियवादिनी।
अरण्यं तेन गन्तव्यं यथारण्यं तथा गृहम् ॥

या श्लोकाचा साधा अर्थ असा आहे की, ज्या घरात आई आणि जोडीदाराशी गोड बोलत नाहीत. त्या व्यक्तीसाठी घर आणि वन (जंगल) दोन्ही सारखेच वाटतात. म्हणजेच, घरात आपुलकी, प्रेम आणि गोड बोलणे खूप महत्त्वाचे आहे. विशेषतः जोडीदाराने प्रेमाने वागलं तर नातं टिकतं आणि आनंदी राहतं. पण जर सतत कठोर किंवा कटू बोलणं असेल, तर घरातही शांतता आणि आनंद राहत नाही.

४. सर्वात चांगला मित्र कोण?

विद्या मित्रं प्रवासेषु भार्या मित्रं गृहेषु च।
व्याधितस्यौषधं मित्रं धर्मो मित्रं मृतस्य च॥

या श्लोकात चाणक्य सांगतात की, ज्याप्रमाणे औषध रुग्णाचा मित्र असतो, त्याचप्रमाणे तुमची जोडीदार (पत्नी) ही घरात तुमची सर्वात चांगली मैत्रीण असते, जी सुख-दुःखात तुम्हाला साथ देते. म्हणून, तुम्ही तुमच्या जीवनसाथीचा नेहमी आदर केला पाहिजे.