Chanakya Niti for Success : आपल्या जीवन अनुभवांवर आणि सखोल ज्ञानावर आधारित, आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथातून मानवी जीवनाच्या प्रत्येक लहान सहान बारकावे शिकवले. त्यांची तत्त्वे आपल्याला आपले जीवन कसे जगावे, संपत्ती, ज्ञान व बुद्धिमत्तेचा उपयोग कसा करावा हे शिकवतात. आपण आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या चार चांगल्या सवयींवर चर्चा करणार आहोत…

प्रत्येकाला आयुष्यात आनंदी आणि यशस्वी व्हायचे असते. कारण – खाणे, पिणे, आवडत्या वस्तू खरेदी करणे, चित्रपट पाहणे, प्रवास करणे या सगळ्या गोष्टी आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपण यशस्वी आणि आनंदी होतो. जर तुम्ही आनंदी राहिलात तर तुमच्या जीवनातील समस्या आपोआपच सुटतात. म्हणूनच आनंदी राहण्यासाठी संधी शोधणे महत्त्वाचे आहे. तर मग यासाठी कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत त्याबद्दल जाणून घेऊयात…

पुढील सवयी तुम्हाला यशस्वी आणि आनंदी बनवतात…

‘दारिद्र्यनाशनं दानं शीलं दुर्गतिनाशनम्! अज्ञाननाशिनी प्रज्ञा भावना भयनाशिनी’

आचार्य चाणक्य म्हणतात की, दान, चांगलं वागणं, ज्ञान आणि श्रद्धा या गोष्टी आयुष्य सुधारायला मदत करतात. चांगल्या वागणुकीमुळे दुःख कमी होतं, वाईट परिस्थिती (दुर्गती) सुधारते, बुद्धीने अज्ञान दूर होतं आणि ईश्वरभक्तीने भीती दूर होते.

चला, चाणक्याच्या या श्लोकाचा अर्थ सविस्तरपणे समजून घेऊया….

दारिद्र्यनाशनं दानं

याचा अर्थ असा की, दान दिल्याने दारिद्र्य नष्ट होते. चाणक्य सांगतात की, जो मनुष्य नियमितपणे दान करतो, तो दारिद्र्यापासून मुक्त होतो आणि त्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

शीलं दुर्गतिनाशनम्

सद्गुण म्हणजे चांगले वर्तन, चांगली वागणूक आणि नैतिकता जीवनातील दुःख नाहीसे करते. याचा अर्थ असा की, सज्जन आणि चांगल्या चारित्र्याच्या व्यक्तीला समाजात कधीही तुच्छ मानले जात नाही.

अज्ञाननाशिनी प्रज्ञा

योग्य, सखोल ज्ञान, मनुष्याचे अज्ञान नष्ट करण्यास मदत करते.

भावना भयंकराशिनी

खरी भावना, म्हणजेच श्रद्धा, विश्वास, भक्ती आणि सकारात्मक विचार, सर्व प्रकारची भीती नाहीशी करते.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)