Chanakya Niti Signs Of A Trustworthy Man: आयुष्याच्या प्रवासात आपल्याला अनेक माणसे भेटतात. मात्र, त्यातील सर्वच जण विश्वासू असतात, असे नाही. अनेकदा आपली पारख चुकते आणि आपल्याला फसवणुकीचा सामना करावा लागतो. अशा वेळी खऱ्या आणि विश्वासू माणसांची ओळख कशी पटवायची, हा मोठा प्रश्न असतो. शास्त्र आणि अनुभवानुसार, विश्वासू लोकांच्या वागण्या-बोलण्यात काही विशिष्ट लक्षणे दडलेली असतात. ज्यांच्या पाठीमागे अशी माणसे खंबीरपणे उभी असतात, ते लोक खरोखरच नशीबवान ठरतात. चाणक्य नीतीमध्ये अशा विश्वासू लोकांची काही खास वैशिष्ट्ये सांगितली आहेत, ज्यामुळे ते लोक इतरांपेक्षा वेगळे ठरवतात. चाणक्यांनी विश्वासू व्यक्तीची कोणती वैशिष्ट्ये सांगितली आहेत, ते आपण जाणून घेऊ…
१) कठीण परिस्थितीतही खंबीर
खंबीर व्यक्ती तीच असते, जी अडचणींना घाबरून मागे हटत नाही. जेव्हा परिस्थिती कठीण होते, तेव्हा त्या व्यक्तीचे खरे महत्त्व लक्षात येते. ती आपल्या नात्यापासून दूर पळत नाही किंवा आपल्या जबाबदाऱ्या टाळत नाही. ती आपली कामे व वैयक्तिक आयुष्य यांच्यात संतुलन राखते आणि आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करते.
२) स्वतःचा कमकुवतपणा स्वीकारण्याची क्षमता
एक परिपक्व व्यक्ती आपल्या भावनांना घाबरत नाही. तिच्यामध्ये स्वतःसोबत वेळ घालवण्याची आणि स्वतःच्या कमकुवतपणाला स्वीकारण्याची क्षमता असते. ती शांततेला घाबरत नाही, उलट तिचा उपयोग समजून घेण्याचे एक साधन म्हणून करते. म्हणूनच ती आपल्या जोडीदाराच्या भावना नाकारत नाही, उलट त्या समजून घेण्याचा प्रयत्न करते.
३) कृती न देता आश्वासन करणारे
आजकाल बरेच लोक मोठमोठी आश्वासने देतात; पण त्यांची कृती त्या आश्वासनांशी जुळत नाही. असे लोक सुरुवातीला आकर्षक वाटू शकतात; पण हळूहळू त्यांचा खरा स्वभाव उघड होतो. अशा लोकांपासून, विशेषतः जे सतत स्वतःची स्तुती करतात, त्यांच्यापासून दूर राहणेच उत्तम.
४) जबाबदारी घेण्याची तयारी
जी व्यक्ती जबाबदारी टाळते, त्यांचे नातेसंबंध स्थिर राहण्याची शक्यता कमी असते. त्यांना सोबतीची गरज असते; पण अडचणी आल्यावर तीच सर्वांत आधी मागे हटते. ती नातेसंबंधांचे खऱ्या अर्थाने संगोपन करण्याऐवजी, केवळ दिखाव्यासाठीच ते टिकवून ठेवते. त्यामुळे अशा व्यक्तींना टाळणेच शहाणपणाचे ठरते.
५) वर्तमानाच्या आनंदासह भविष्यासाठी नियोजन
भविष्याबद्दलची गांभीर्यता हादेखील एक आवश्यक गुण आहे. जो माणूस आपल्या जीवनातील ध्येयांविषयी अनिश्चित असतो किंवा जो नेहमी सुखोपभोगात मग्न असतो, तो स्वतःच्या तसेच आपल्या जोडीदाराच्या भविष्यालाही हानी पोहोचवू शकतो. शहाणा माणूस तोच असतो, जो वर्तमानाचा आनंद घेण्यासह भविष्यासाठी नियोजनही करतो.
