महान मुत्सद्दी आचार्य चाणक्य यांच्या धोरणांमुळेच नंद वंशाचा नाश झाला आणि चंद्रगुप्त मौर्याला सम्राटाचा मुकुट मिळाला. आचार्य चाणक्‍यांची नीति माणसाला केवळ यश मिळवून देत नाही तर अनेक संकटांपासून वाचवते. या धोरणांमध्ये व्यक्तीने आपल्या जीवनात कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर ठेवले पाहिजे हे सांगितलंय. नाहीतर आयुष्यात वाईट वेळ यायला वेळ लागत नाही.

या वेळेत आपलेही साथ सोडून जातात
चाणक्य नीति म्हणते की पैसा जरी सर्व सुख विकत घेऊ शकत नसला तरी जीवनासाठी ते खूप महत्वाचे आहे. माणसाकडे पैसा नसतानाही त्याचेच लोक त्याला सोडून जातात. मग ते त्याचे भाऊ-बहीण असोत, पत्नी असोत वा मित्र असोत, नोकर-चाकर असोत. जेव्हा एखादी व्यक्ती श्रीमंत होते, तेव्हा सर्व लोक त्याच्याशी संबंध ठेवण्यास उत्सुक असतात. म्हणूनच पैसा असणं खूप महत्वाचे आहे.

medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 

आणखी वाचा : Dussehra 2022 : यावर्षी दसरा ४ की ५ ऑक्टोबरला? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

…पण पैसे कमवताना ही चूक करू नका
आचार्य चाणक्य यांनी पैशाचे महत्त्व तसंच ते मिळवण्याचे मार्ग सांगितले आहेत. चाणक्य नीति म्हणते की, चुकीच्या पद्धतीने कमावलेल्या पैशापेक्षा कमी पैशात जगणे चांगले आहे. कारण अनैतिक काम करून मिळवलेला पैसा जास्तीत जास्त १० वर्षे व्यक्तीकडे राहतो. असा पैसा कधी ना कधी निघून जातो. तसेच चुकीची कामे करून कमावलेला पैसाही अनेक संकटे घेऊन येतो. त्यामुळे व्यक्तीची प्रतिमाही खराब होते.

(टीप: इथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)