Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी केवळ अर्थशास्त्र, राजकारण याविषयी सांगितले नाही तर दैनंदिन जीवनातील त्रास टाळण्यासाठी उपाय देखील सांगितले आहेत. त्यांनी नीतिशास्त्रात जीवनातील अनेक बाबींवर सविस्तर प्रकाश टाकला आहे. नीतिशास्त्रात सांगतिलेल्या धोरणांचा वेळीच अवलंब केला, तर जीवनात संकट येत नाहीत. नीतिशास्त्राप्रमाणे राहण्याचा किंवा वागण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. आचार्य चाणक्य यांनी स्त्री पुरुषां विषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. जसं की स्त्री पुरुषांनी आपल्या गोष्टी कधीच कुणासमोर सांगू नये नाहीतर याने भविष्यात त्रास होऊ शकतो. चला जाणून घेऊया आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या कोणत्या आहेत या गोष्टी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्थिक नुकसान

आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार जर तुमचं नुकसान झालं असेल तर ते कधीही कोणासमोर व्यक्त करू नये. कारण लोक याबाबत समोर दु:ख व्यक्त करतील पण प्रत्यक्षात मात्र आनंदी असतील. तसेच याऊलट तुमच्या मागेच बोलत बसतील. यामुळे तुमचा समाजातील सन्मान देखील कमी होतो. त्यामुळे पैशाचे नुकसान झाल्याचं कोणालाही सांगू नका. अन्यथा लोकं तुमच्यापासून दूर जाऊ शकतात.

( हे ही वाचा: ८ दिवसांनी ‘या’ राशी होणार श्रीमंत? ग्रहांचा राजा सूर्य देणार प्रचंड धनलाभाची संधी)

चारित्र्य

आचार्य चाणक्य यांच्या मते लग्न झालेल्या स्त्री-पुरुषांनी एकमेकांबद्दल आदर ठेवला पाहिजे. एकमेकांच्या चुका दाखवून देणं कमी केलं पाहिजे. यासोबत कुटुंबामध्ये होणारी भांडणे आपापसात सोडवावी. यासोबतच स्त्री किंवा पुरुष घरातील गोष्टींबद्दल बाहेरील कोणत्याही व्यक्तीला सांगत असेल तर त्याचा वाईट परिणाम वैवाहिक जीवनात पडू शकतो. कारण तुम्ही ज्या व्यक्तीला ह्या गोष्टी सांगाल ती दरवेळी तुमच्या दुःखात सामील होईल असं नाही. वेळ आल्यावर ती तुमची चेष्टाही करू शकते.

बदनामी

आचार्य चाणक्य यांच्या मते जर तुमचा कोणी अपमान केला असेल तर ते कोणालाही सांगू नका. कारण ज्या व्यक्तीला ही गोष्ट सांगणार आहात ती व्यक्ती तुमचे म्हणणे ऐकून घेण्यापेक्षा त्यावर हसू शकते. म्हणून तुमच्यासोबत झालेल्या अपमानाबद्दल कोणालाही सांगू नका.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti says men and woman dont share these secrete to anyone gps
First published on: 08-12-2022 at 19:26 IST