जीवनात शत्रू किंवा आपलं वाईट व्हावं असं वाटणारी माणसं असणे सामान्य आहे. कधीकधी आपण अशा लोकांना स्पष्टपणे पाहतो, परंतु कधीकधी आपण त्यांना ओळखण्यात चूक करतो. मग या चुका आयुष्याला खूप भारी पडतात. एक महान विद्वान आणि मुत्सद्दी आचार्य चाणक्य म्हणतात की, तुमच्या आयुष्यात अशा लोकांशी कधीही शत्रुत्व करू नका, ज्यांच्यापासून तुम्हाला हरण्याची भीती वाटते. यासाठी त्यांनी चाणक्य नीति शास्त्रामध्ये अशा काही लोकांचा उल्लेख केला आहे, ज्यांच्याकडून कधीही शत्रुत्व घेऊ नये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चुकूनही यांच्याशी वैर बाळगू नका
शस्त्र असलेली व्यक्ती: ज्यांच्याकडे शस्त्र आहेत त्यांच्याशी कधीही शत्रुत्व करू नका. रागाच्या भरात ते तुमचे मोठे नुकसान करू शकतात. अशा लोकांपासून दूर राहणे चांगले.

जवळचा मित्र: ज्याला तुम्ही तुमच्या मनातील सर्व गोष्टी सांगता अशा जवळच्या व्यक्तीशी कधीही शत्रुत्व करू नका. अन्यथा, तो तुमच्या अशा गोष्टींचा पर्दाफाश करू शकतो, ज्यामुळे तुमची प्रतिमा खूप खराब होऊ शकते.

आणखी वाचा : Chanakya Niti: चाणक्य नीतिमधल्या त्या गोष्टी, जे बदलतील तुमचं नशीब

मूर्ख व्यक्ती: मूर्ख लोकांपासून दूर राहणे चांगले आहे, परंतु मूर्ख व्यक्तीशी शत्रुत्व किंवा मैत्री केल्याने खूप नुकसान होते. अशा लोकांना ना स्वतःच्या चांगल्या-वाईटाची, प्रतिष्ठेची किंवा इतर कोणाचीही पर्वा नसते. अशा वेळी त्यांच्याशी शत्रुत्व पत्करून ते तुमच्याबद्दल कधीही, कुठेही काहीही बोलून तुमची प्रतिमा डागाळू शकतात.

डॉक्टर किंवा आचारीशी शत्रुत्व : आचार्य चाणक्य म्हणतात की, तुमच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी कधीही शत्रुत्व विकत घेऊ नका. तो तुमची अशी हानी करू शकतो, ज्याची भरपाई करणे कदाचित अशक्य आहे. त्याचप्रमाणे आचाऱ्याशी शत्रुत्व केल्यास तुमचा मृत्यू होऊ शकतो.

श्रीमंत आणि खूप शक्तिशाली व्यक्ती: ज्यांच्याकडे खूप पैसा आहे किंवा जे खूप शक्तिशाली आहेत त्यांच्याशी शत्रुत्व करू नका, ते आपल्या फायद्यासाठी कितीही नुकसान करू शकतात.

(टीप: इथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti says never make enemy with these 5 people you will always be defeated and life will be ruined prp
First published on: 18-09-2022 at 12:12 IST