Chanakya Niti In Marathi: आचार्य चाणक्यांनी माणसाला आनंदी आणि उद्देश पूर्ण जीवन जगण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी आपल्या पूर्वजांचा वारसा आणि धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या चाणक्य नीती या नीती पुस्तकात श्लोकांच्या रूपात हे संकलन केले आहे. चाणक्य नीतीने जीवनातील यश, योग्य-अयोग्य, नैतिक-अनैतिक, धार्मिक-अनीति याविषयी तपशीलवार वर्णन केले आहे. त्यांचा अवलंब करून प्रत्येक व्यक्ती आपले जीवन आनंदाने जगू शकते. तसेच आचार्य चाणक्य यांनी अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या पुरुषांनी कोणालाही सांगू नयेत. चला जाणून घेऊया चाणक्य नीतिनुसार अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या पुरुषांनी कोणाशीही शेअर करू नयेत.
आचार्य चाणक्य म्हणतात की ज्ञानी व्यक्तीने या सर्व गोष्टी आपल्या मनात लपवून ठेवल्या पाहिजेत आणि त्या इतर कोणाला सांगू नयेत. कारण त्या गोष्टी समजल्यानंतर लोक त्याच्यावर हसतात. अशा स्थितीत त्यांनी स्वत: त्या स्थितीचा सामना करावा आणि योग्य संधी शोधत राहावे.
श्लोक
अर्थनाशं मनस्तापं गृहे दुश्चरितानि च ।
वञ्चनं चाऽपमानं च मतिमान्न प्रकाशयेत्।।
अर्थ
बुद्धिमान व्यक्तीने आपल्या संपत्तीचे नुकसान, मानसिक वेदना, घरातील दोष, कोणाकडून फसवणूक होणे, आपला अपमान याविषयी कोणासही उघड किंवा सांगू नये.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार पुरुषांनी काही गोष्टी कोणालाही सांगून नयेत. असे होऊ शकते की येणाऱ्या काळात या गोष्टी तुमच्या विरोधात जातील. जाणून घ्या पुरुषांनी कोणत्या गोष्टी इतरांना सांगू नयेत?
पैशाचे नुकसान झाल्यास इतरांना सांगू नये
प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी पैशाचे नुकसान सहन करावे लागते, त्याच्या मनात काही ना काही दु:ख किंवा वेदना असू शकतात. अशा वेळी त्याचे दु:ख कमी करण्यासाठी तो ही गोष्ट त्याच्या मित्रांना किंवा इतर कोणाला सांगतो. असे केल्याने तुमचे दु:ख आणखी वाढू शकते. आचार्य चाणक्य म्हणतात की,”जर एखाद्या व्यक्तीला धनहानी झाली असेल तर धक्का बसण्याऐवजी त्यातून शिकून पुढे जावे.”
घरातील दोष कोणालाही सांगू नये
प्रत्येक घरात काही ना काही वाईट असतेच. काहीजण ते लपवतात, तर काहीजण त्यांच्या मित्रांशी किंवा इतर लोकांशी याबद्दल बोलतात. आचार्य चाणक्य म्हणतात की,”जर तुम्ही तुमच्या घरातील दोष एखाद्याला सांगत असाल तर याचा अर्थ तुम्ही तुमचा मान आणि सन्मान गमावत आहात. या आधारावर तो तुमच्याशी संबंधित प्रतिमा तयार करेल. हे शक्य आहे की ती व्यक्ती तुमच्या पाठीमागे या गोष्टींची चेष्टा करते.
हेही वाचा – Mangal Gochar 2024 : २० ऑक्टोबरपर्यंत ‘ या ‘ पाच राशींचे नशीब चमकणार! मिळेल भरपूर यश अन् बक्कळ पैसा
कोणाकडून तरी फसवणूक झाल्यास कोणालाही सांगू नये
अनेकवेळा फसवणूक केली जाते. हे प्रत्येक व्यक्तीबरोबर कोणत्या ना कोणत्या प्रकारे घडते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार फसवणूक झाल्यास सर्वांना सांगू नये. यामुळे तो तुमच्या बौद्धिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतो किंवा कोणीही तुम्हाला सहज फसवू शकेल अशी प्रतिमा त्याच्या मनात निर्माण होईल. हे शक्य आहे की, भविष्यात ती व्यक्ती तुमचा विश्वासघात करेल किंवा तुमची चेष्टा करेल.
एखाद्याने अपमान केल्यास कोणालाही सांगू नये
जर तुम्हाला कोणाकडून अपमान सहन करावा लागत असेल तर हे सर्वांना सांगू नका. यामुळे तुमच्यावर हसण्यासाठी त्यांना कारण मिळू सकते. तसेच तुमचा अपमान करण्यापासून सर्वजण मागे हटणार नाहीत.
टीप- सदर लेख मिळालेल्या माहितीवर आधारित आहे.