Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीति्द्वारे यशस्वी आयुष्य जगण्याचा मंत्र सांगितला आहे. त्यांनी सांगितले आहे की आयुष्यात व्यक्तीला नवीन शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते व्यक्ती जेव्हा इच्छा होईल तेव्हा काही ना काही शिकू शकतो. चाणक्य यांच्या मते आपण पशु आणि प्राण्यांकडून भरपूर गोष्टी शिकू शकतो. चाणक्य यांनी सांगितले आहे की जर शिकायची इच्छा असेल तर मनुष्य कोणापासूनही काहीही शिकू शकतो. चाणक्य नीतिमध्ये सांगितल्याप्रमाणे, आज आपण माणसाने कुत्र्यापासून काय शिकायला पाहिजे, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

श्लोक

वह्वाशी स्वल्पसन्तुष्टः सुनिद्रा लघुचेतन:।
स्वामिभक्तश्च शूरश्च षडेते श्वानतो गुणाः॥

कुत्रा कितीही भुकेला असला तरी त्याला जेवढे मिळेल त्यातच तो समाधान करून घेतो, त्याचबरोबर त्याला जेवढे खायला घालाल तेवढे तो सगळे खातो. थोड्याच वेळात त्याला गाढ झोप लागते पण गाढ झोपेत असतानासुद्धा थोड्याशा आवाजाने तो जागा होो आणि मालकाशी प्रामाणिक राहून धाडसीपणा दाखवत एखाद्यावर तुटून पडतो.

भूक लागलेली असताना सुद्धा थोड्या जेवणात समाधानी होणे, गाढ झोपेत सुद्धा सतर्क राहणे, मालकाशी प्रामाणिक राहणे आणि धाडसीपणा दाखवणे हे चार गुण आपण कुत्र्यापासून शिकायला पाहिजे.

समाधानी राहा

आचार्य चाणक्य सांगतात, व्यक्तीने नेहमी जेवणाच्या मागे धावू नये. जेवढे जेवण मिळते तेवढ्यात समाधानी राहावे. जर तुम्हाला भूक लागली असेल आणि त्यावेळी तुम्हाला खूप कमी जेवण मिळाले असेल तर ते प्रेमाने खाऊन घ्यावे. आचार्य चाणक्य सांगतात, तुमच्या जवळ जी गोष्ट आहे, ती प्रेमाने खावी. कधीही अति अपेक्षा करू नये. कारण यामुळे तुम्हाला दु:ख मिळू शकते.

गाढ झोपेत सतर्क राहणे

चाणक्य सांगतात, जर तुम्ही गाढ झोपेत असाल तरी व्यक्तीने सतर्क राहणे गरजेचे आहे. छोट्या आवाजाने सुद्धा कुत्रा झोपेतून जागा होतो तसेच मनुष्याची सुद्धा झोप असावी ज्यामुळे गरज पडल्यावर सतर्क राहता येईल.

मालकाशी प्रामाणिक

आचार्य चाणक्यनुसार, व्यक्तीने कुत्र्याप्रमाणे मालकाशी प्रामाणिक राहावे. त्यामुळे एक कुत्रा आपल्या मालकाबरोबर प्रामाणिक असतो. त्याप्रमाणे मनुष्य सुद्धा ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याशी प्रामाणिक राहावे. नोकरी असो किंवा एखाद्या संस्थेप्रती प्रामाणिक राहावे. कारण यामुळे हे लोक आपले लक्ष्य प्राप्त करून आनंदी जीवन जगू शकतात.

धाडसीपणा

कुत्र्यापासून धाडसीपणा शिकायला पाहिजे. एक धाडसी प्राणी नेहमी मालकाला सुरक्षित ठेवतो आणि मालकासाठी जीव सुद्धा गमावण्यास मागे पुढे पाहत नाही. तसेच व्यक्तीने न घाबरता धाडसी असायला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास तयार पाहिजे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)