Chanakya Niti For Enemies And Success : आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्रात जीवनाच्या विविध पैलूंविषयी सल्ले दिले आहेत. चाणक्यांनी सांगितलेल्या नियमांचे किंवा सल्ल्यांचे पालन करून तुम्ही जीवनात खूप यशस्वी होऊ शकता. तुम्ही शत्रूपेक्षा नेहमी दोन पावलं पुढे राहून विजय मिळवू शकता. नेहमी यशाच्या पायऱ्या चढत यशाची नवीन शिखरे गाठू शकता, पण यासाठी काय केलं पाहिजे जाणून घेऊ….

१) कमी लेखू नका

आचार्य चाणक्यांच्या मते, शत्रूंना पराभूत करण्याची पहिली अट म्हणजे त्यांना कधीही कमी लेखू नये. त्यांना कमी लेखण्याची चूक महागात पडू शकते. असे केल्याने खेळात अपयश येऊ शकते, म्हणून तुमचा शत्रू कितीही बलवान असला तरी त्याला कधीही कमी लेखू नका.

२) प्लॅन नेहमी गुप्त ठेवा

आचार्य चाणक्यांच्या मते, जर तुम्हाला तुमच्या शत्रूच्या दोन पावले पुढे राहायचे असेल आणि त्याला पराभूत करायचे असेल तर तुमचे प्लॅन नेहमी गुप्त ठेवा. तुमच्या गोष्टी खाजगी ठेवल्याने तुम्हाला तुमच्या शत्रूवर वर्चस्व गाजवण्यास आणि त्याला पराभूत करण्यास मदत होऊ शकते.

३) मानसिकता समजून घ्या

चाणक्यांच्या मते, शत्रूला हरवण्यासाठी तुम्हाला त्यांची मानसिकता आणि रणनीती समजून घ्यावी लागेल, यामुळे तुम्हाला त्यांच्याविरुद्ध एक योग्य योजना आखता येईल आणि वेळ आल्यावर त्यांना हरवता येईल.

४) गोड शब्दांना बळी पडू नये

आचार्य चाणक्य म्हणतात की, ज्याप्रमाणे विंचू सतत दबा धरून बसतो, त्याचप्रमाणे शत्रू कधीही तुमचा विश्वासघात करू शकतो, म्हणून जर एखादा शत्रू तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही चुकूनही त्याच्यावर विश्वास ठेवू नये. तुम्ही त्याच्या गोड शब्दांना बळी पडू नये; जरी तुम्ही त्याचे बोलणे ऐकले तरी त्याप्रमाणे वागू नये. जर तुम्ही हे लक्षात ठेवले तर तुमचा शत्रू तुम्हाला कधीही इजा पोहोचवू शकणार नाही.

५) शांतपणे वागा

चाणक्य नीतीनुसार, तुम्ही तुमच्या शत्रूशी नेहमी शांततेने वागले पाहिजे, पण त्याच्या हावभावांवरही नेहमी लक्ष ठेवले पाहिजे.

(टीप – वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)