Chanakya Niti for Couples: महान अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि व्यावहारिक गोष्टींचे मार्गदर्शक आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणात जोडप्यांसाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीने कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे चाणक्य नीतिमध्ये सांगण्यात आले आहे. पती-पत्नीपैकी कोणाकडूनही चूक झाली तर वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात. घरातील शांतता भंग पावते. आज आपण चाणक्य नीतिमध्ये सांगितलेल्या त्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया, ज्या पती-पत्नीने अंगीकारल्यास त्यांच्यातील प्रेम कधीच कमी होत नाही.

पती-पत्नीने नेहमी या गोष्टींचे पालन करावे
केवळ प्रेमच नाही तर आदरही : पती-पत्नीने एकमेकांवर खूप प्रेम केले पाहिजे, ही चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे, हे खूप महत्त्वाचे आहे. जर पती-पत्नीच्या नात्यात एकमेकांबद्दल आदर नसेल, तर जोडप्यात समस्या निर्माण होणे साहजिक आहे. एकमेकांचा आदर केल्याने पती-पत्नीचे नाते घट्ट होते.

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

आणखी वाचा : Chanakya Niti: मोठमोठ्या संकटातही या लोकांची मदत मागू नका, ते शत्रूपेक्षाही वाईट असतात!

गर्व बळगू नका : पती-पत्नीच्या नात्यात गर्वाचं असणं हे नातं बिघडू शकतं. ते नेहमी टाळा. पती-पत्नी दोघांना समान दर्जा मिळाल्यावरच वैवाहिक जीवन चांगले जाते आणि दोघेही प्रतिस्पर्धी बनत नाहीत, तर एकत्र जीवनात पुढे जातात. दुसऱ्याला कमी लेखल्याने वैवाहिक जीवन नष्ट होऊ शकते.

गोपनीयता: पती-पत्नीने त्यांच्या गोष्टी कधीही समोरच्याला सांगू नयेत. त्यांनी त्यांचे शब्द स्वतःपुरते ठेवावेत. यामुळे आदरही कमी होतो आणि नात्यावरही वाईट परिणाम होतो.

आणखी वाचा : Chanakya Niti: या कामांसाठी पैसे खर्च करण्यास मागेपुढे पाहू नका, लक्ष्मीची कृपा आयुष्यभर राहील

संयम : पती-पत्नी हे सुख-दु:खाचे साथीदार आहेत. आयुष्यातील सर्व चढ-उतारांना ते एकत्र सामोरे जातात. त्यामुळे दोघांमध्ये संयम असणे आवश्यक आहे. एका जोडीदाराने हिंमत गमावली, तर दुसरा संयमाने त्याची काळजी घेतो, तरच प्रत्येक अडचणीवर मात करूनही त्याचे जीवन आनंदी होऊ शकते.

(टीप: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)