Chandra Guru Yuti 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो.

पंचांगानुसार, मागील अनेक दिवसांपासून देवगुरू बृहस्पती मिथुन राशीत विराजमान असून २६ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजून ५४ मिनिटांनी चंद्रदेव देखील मिथुन राशीत प्रवेश करतील. चंद्राच्या मिथुन राशीतील प्रवेशाने मिथुन राशीमध्ये गुरू ग्रहाबरोबर चंद्राची युती निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रामध्ये ही युती अतिशय लाभदायक मानली जाते. हे दोन ग्रह जेव्हा एकत्र येतात तेव्हा गजकेसरी राजयोग निर्माण होतो. या योगाच्या प्रभावाने नक्कीच काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल.

गजकेसरी राजयोग ‘या’ राशींचे भाग्य उजळवणार

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशींच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग नक्कीच अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक चांगल्या गोष्टी घडतील. अविवाहितांचे लग्न जुळेल, प्रेमसंबंध अधीर मजबूत आणि मधुर होतील. कामातील अडथळे दूर होऊन करिअरमध्ये प्रचंड यश मिळेल. मनासारख्या गोष्टी करायला मिळतील. तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचे प्रबळ योग जुळून येतील. अशक्य गोष्टी शक्य होतील. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. पगारवाढ होईल व उच्च पद देखील मिळू शकते. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्यांना उत्तम यश मिळेल.

कर्क (Kark Rashi)

चंद्राचा मिथुन राशीतील प्रवेश कर्क राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल. धार्मिळ स्थळांना भेट द्याल, मन प्रसन्न राहील. मानसिक थकवा दूर होईल.

मेष (Mesh Rashi)

मिथुन राशीतील चंद्र-गुरूची युती मेष राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. बँक बॅलन्स झपाट्याने वाढेल. करिअरमध्ये भरपूर यश मिळेल.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी मिथुन राशीतील गजकेसरी राजयोग खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)