Moon And Mars Yuti : ज्योतिषशास्त्रानुसार, महालक्ष्मी राजयोग हा सर्वात शुभ योगांपैकी एक मानला जातो. कारण – तो प्रचंड संपत्ती, यश, समृद्धी, ऐश्वर्य आणतो. असे मानले जाते की, या योगाचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनात आनंद व सुदैव वाढवतो आणि आर्थिक स्थिती देखील मजबूत करतो. ज्योतिषांच्या मते, हा शुभ राजयोग सध्या सुरु असणाऱ्या ऑगस्ट महिन्यात तयार होईल आणि त्याचे परिणाम अनेक राशींवर दिसून येतील.

मंगळ सध्या मिथुन राशीत आहे. त्याचबरोबर चंद्र देखील ९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून ४८ मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ व चंद्राच्या या युतीमुळे मिथुन राशीत महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे हा शुभ योग काही राशींना यश व सन्मान मिळवून देऊ शकतो. याशिवाय संपत्ती, समृद्धी, सुखसोयींमध्ये वाढ होण्याची आणि रखडलेल्या प्रकल्पांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. चला तर या भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊयात.

मिथुन

मंगळ व चंद्राच्या युतीमुळे महालक्ष्मी राजयोग तयार होईल. या राशीच्या व्यक्तींना यामुळे विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाच्या नवीन संधी उपलब्ध होतील, व्यवसायात सकारात्मक बदल अनुभवता येतील, तुमचा सामाजिक दर्जा वाढेल, आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत. नवीन लोकांना भेटाल तर कामाशी संबंधित योजना आखण्यात यश मिळेल.

कन्या

तुम्हाला भाग्याची साथ मिळू शकते. तुमच्या प्रयत्नांना फळ मिळेल, आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता दिसते आहे. करिअरला एक नवीन दिशा मिळेल, देशात व परदेशातही आदर मिळेल. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवण्याची संधी तर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर हा काळ नवीन संधी घेऊन येऊ शकतो.

मकर

तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. आर्थिक लाभाची होईल, आरोग्याच्या समस्याही हळूहळू नाहीशा होऊ शकतात. घरी पूजा किंवा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार करू शकता. कुटुंब आनंदाने भरून जाईल, आर्थिक बाबतीतही सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. हा काळ तुम्हाला भाग्याचे पूर्ण पाठबळ आणि सहकार्य देईल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)