chandra and mangal yuti : ज्योतिषशास्त्रानुसार, वेळोवेळी ग्रहांचे भ्रमण होऊन राजयोग आणि शुभ योग तयार होतात, ज्यांचे परिणाम मानवी जीवनात आणि जगात जाणवतात. या महिन्यात ग्रहांचा स्वामी मंगळ आणि मनाचा स्वामी चंद्र यांची मीन राशीत युती होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा ऊर्जा, बंधू, भूमी, शक्ती, धैर्य, शौर्य व पराक्रम यांचा स्वामी मानला जातो. तर चंद्र हा मन, मानसिक स्थिती, भौतिक संपत्ती, प्रवास, सुख, शांती, धन यांचा स्वामी मानला जातो. त्यामुळे या राजयोगाचे परिणाम सर्व क्षेत्रांत आणि राशींच्या लोकांना जाणवतात. तर पंचांगानुसार, १६ एप्रिल रोजी मनाचा ग्रहस्वामी चंद्र, मीन राशीत प्रवेश करणार जिथे मंगळ आधीच उपस्थित असणार आहे. अशा परिस्थितीत या दोन ग्रहांच्या युतीमुळे महालक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे.
महालक्ष्मी राजयोग कोणासाठी ठरेल लकी?
मीन
हा राजयोग तुमच्या राशीच्या कुंडलीच्या लग्नघरात तयार होत असल्यामुळे हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. त्यामुळे करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या, आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी चालून येतील. प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. पण, भावनांच्या प्रभावाखाली कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होतील. त्यामुळे संयम बाळगणे गरजेचे ठरेल. विशेषतः आर्थिक बाबतीत काळजीपूर्वक निर्णयघेण्याचा प्रयत्न करा.
धनु
राशीच्या कुंडलीच्या चतुर्थ घरात हा राजयोग तयार होत असल्यामुळे तुमच्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. घरात सुखसोई आणि ऐश्वर्य वाढू शकते. मालमत्ता, वाहनांशी संबंधित लाभ, कुटुंबात आनंदी वातावरण आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. पण, खर्चही वेगाने वाढतील, कौटुंबिक बाबींमध्ये लहानसहान गोष्टींवरून तणाव निर्माण होईल. खर्चाचे नियोजन करा आणि आपल्या कुटुंबाशी संवाद कायम ठेवा.
मिथुन
करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत हा काळ शुभ ठरू शकतो. हा राजयोग तुमच्या राशीपासून दहाव्या घरात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये बढती, नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातही नवीन संधी निर्माण होऊ शकतात, जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे; पण या काळात तुम्ही प्रयत्न आणि कठोर परिश्रम करत राहिले पाहिजे. कामाचा दबाव, मानसिक ताण आणि सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यतासुद्धा दिसते आहे.
