Chandra And Rahu Grahan Yog : ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह वेळोवेळी त्यांच्या राशी बदलतात, ज्यामुळे वेगवेगळे योग निर्माण होतात. यापैकी, चंद्राच्या गोचराला विशेष महत्त्व असते. कारण तो सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह मानला जातो. चंद्र साधारणपणे दर अडीच दिवसांनी राशी बदलतो, ज्यामुळे शुभ आणि अशुभ दोन्ही योग निर्माण होतात. सध्या, चंद्र मंगळाच्या राशीत, म्हणजेच वृश्चिक राशीत असणार आहे. पण, १३ एप्रिल २०२६ रोजी तो शनीच्या राशीत, म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत आधीपासूनच राहू ग्रह आहे. परिणामी, चंद्र आणि राहू एकत्र येऊन ‘ग्रहण योग’ निर्माण होईल. हा योग काही राशींसाठी तणाव आणि मानसिक अस्थिरता आणू शकतो.

कर्क

तुमच्यासाठी हा काळ थोडा आव्हानात्मक असू शकतो. ग्रहण योगाच्या प्रभावामुळे मानसिक ताण वाढेल, लहानसहान गोष्टींवरून चिंता वाटेल. तुम्ही नातेसंबंधांबद्दल अधिक विचार कराल. कामातील निष्काळजीपणा महागात पडू शकतो, त्यामुळे तुमचे काम दुसऱ्या कोणावरही सोपवू नका. आता गुंतवणूक करणे टाळा, अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

कन्या

तुमच्या राशीसाठी हा काळ संयम आणि समजूतदारपणा दाखवण्याचा असेल. तुम्हाला तुमच्या अभ्यासात किंवा कामात एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो. तुम्ही डोक्यात ठरवलेल्या कोणत्याही नवीन प्रकल्पांना अडथळे येऊ शलतात. या काळात वादात पडणे टाळा आणि संवादाने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. शब्दांबाबत, संयमाबाबत आणि शांततेबाबत सावधगिरी बाळगावी, अन्यथा नवीन वाद निर्माण होऊ शकतो.

मीन

तुम्हाला नातेसंबंधांकडे विशेष लक्ष देण्याची गरज भासणार आहे. तुम्हाला प्रेम जीवनात सुसंवाद राखण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागू शकतात. किरकोळ गैरसमजांचे रूपांतर मोठ्या वादात होऊ शकते. मीन राशीच्या लोकांना कौटुंबिक बाबींबद्दल वाढलेली चिंता देखील जाणवू शकते, ज्यामुळे काही प्रमाणात लक्ष विचलित होऊ शकते. तुमच्या व्यवसायात नवीन लोकांच्या आगमनामुळे तुम्हाला एकटेपणा जाणवू शकतो.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)